Youtube Monetization : लवकरच ५०० सबस्क्रायबर्स असलेले युट्यूबरही कमाई करणार; जाणून घ्या युट्यूबचे नवे नियम

Youtube Monetization : लवकरच ५०० सबस्क्रायबर्स असलेले युट्यूबरही कमाई करणार; जाणून घ्या युट्यूबचे नवे नियम

Published on

पुढारी ऑनलाईन  डेस्क : तुम्ही युट्यूबर आहात का किंवा युट्यूबर होऊ इच्छिता. तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरेल. युट्यूबने मॉनिटायझेशनच्या नियमात शिथिलता आणत युट्यूबर्सना सुखद धक्का दिला आहे. आता तुमच्या युट्यूबचे ५०० सबस्क्रायबर्स असतील आणि तुम्ही ३ हजार तास पाहण्याचा वेळ (Whatch Time) देखील पूर्ण केला असेल तर तुम्ही युट्यूबवरून पैसे कमवण्यास पात्र असणार आहात. वाचा सविस्तर बातमी. (Youtube Monetization)

Youtube ads
Youtube ads

सध्याच्या घडीला युट्यूब हे सोशल मीडिया माध्यम माहिती मिळविण्याचे आणि मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम म्हणता येईल. बहुतांश लोक युट्यूबचा वापर करत असतात. काही जण स्वतःचे YouTube चॅनेल तयार करून त्यावर व्हिडिओ शेअर करत असतात. या माध्यमातून ते कमाई करत आहेत. पण ही कमाई करत असताना युट्यूबचे काही नियम आहे. त्या नियमात तुम्ही बसायला हवे. लवकरच ५०० सबस्क्रायबर्स असलेल्या युट्यूबरही कमाई करु शकणार आहात. त्यासाठी ३ हजार तास पाहण्याचा वेळ (Whatch Time) देखील पूर्ण करावा लागणार आहे.

Youtube Monetization : यापूर्वी मॉनिटायझेशनचे काय होते नियम

यापूर्वी, युट्यूब चॅनेलची कमाई करण्यासाठी, १००० सबस्क्रायबर्सची गरज होती आणि ४००० तास पाहण्याचा वेळ पूर्ण करणे आवश्यक होते. त्याच वेळी, शॉट्स व्हिडिओ दृश्यांचे निकष १० दशलक्ष वरून ३ दशलक्ष (3 दशलक्ष) पर्यंत कमी केले आहेत. युट्यूबने लहान युट्यूबर निर्मात्यांना समर्थन देण्यासाठी कमाई धोरणातही बदल केला आहे.

छोट्या निर्मात्यांना कमाईचे नवीन मार्ग मिळतील

The Verge मधील एका अहवालानुसार, युट्यूबने लहान निर्मात्यांना कमाईचे काही मार्ग देखील तयार केले आहेत. ज्यात सशुल्क चॅट, चॅनल सदस्यत्व आणि खरेदी आदींचा समावेश आहे.

Youtube Monetization : नवीन नियम  कोठे लागू करण्यात आले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूट्यूबने यूएस, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये युट्यूबच्या नवीन कमाईचे धोरण लागू केले आहे. लवकरच भारतासह इतर देशांमध्येही याची अंमलबजावणी होणार आहे.

युट्यूब शॉर्टचेही नियम शिथिल

आता युट्यूबर शॉर्ट व्हिडीओंवर 3 मिलियन (30 लाख) व्ह्यूजनंतर कमाईसाठी अप्लाय करू शकतात. यापूर्वी शॉर्ट व्हिडिओ व्ह्यूजसाठी १० मिलियन (१ कोटी) मर्यादा निश्चित करण्यात आली होती. जी नवीन पॉलिसीमध्ये बदलली आहे. आता क्रिएटर शॉर्ट व्हिडीओवर 3 मिलियन (३० लाख) व्ह्यूजनंतर कमाईसाठी अप्लाय करू शकता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news