‘या’ तरूणीची जिल्‍ह्याभर चर्चा; करते उत्‍तम शेती, दरमहा कमावते २ लाख, अनेकांना दिला रोजगार

‘या’ तरूणीची जिल्‍ह्याभर चर्चा; करते उत्‍तम शेती, दरमहा कमावते २ लाख, अनेकांना दिला रोजगार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने अभ्यासानंतर काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला. ती दिल्ली विद्यापीठातून उत्तीर्ण झाली आहे. आज ती शेतीतून दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. तर 20 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.

2021 मध्ये अनुष्काने लखनौच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेती करायला सुरुवात केली. त्यावेळी ती 23 वर्षांचा होती. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण तिने घेतले आहे. त्यानंतर तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. सरकारकडून मदत घेऊन तिने एक एकरावर पॉली हाऊस सुरू केले. आता ती आणखी 6 एकर शेती करत आहे. जिथे सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या आहेत.

यातून तिला भरपूर नफाही मिळत आहे. शेतात पिकवलेल्या भाज्या लखनौच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जात आहेत. त्यामुळे सातत्याने नफा मिळत आहे. कौटुंबिक इतिहासाबाबत अनुष्काने सांगितले की, माझे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. तर माझा भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसल्याने त्यांच्याकडे वडिलोपार्जित काहीही नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. मग तीन एकर घेतली. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे करता येईल हे अनुष्काने दाखवून दिले आहे.

परिस्थिती अशी होती की एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन होते. तर लाल, पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीचा भावही चांगलाच मिळत आहे. लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे. आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे ही महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करते. तिला फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर पीक अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांना पिकांवर अधिक लक्ष देता येते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news