Rihanna : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहानाची धूम (Video) | पुढारी

Rihanna : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहानाची धूम (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुकेश अंबानी यांचे सर्वात छोटे सुपुत्र अनंत अंबानी आणि प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका यांचे प्री-वेडिंग जामनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील सेलिब्रेटी जामनगर येथे दाखल होत आहेत. (Rihanna) शुक्रवापासून सुरू झालेले हे प्री-वेडिंग तीन दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, यावेळी आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने प्री-वेडिंग फंक्शनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळचा तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Rihanna)

रणवीर-दीपिका पदुकोनने अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात हजेरी लावली

रिहानाने घेतली इतकी मोठी रक्कम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानाचे मानधन ऐकून तुनचे डोळे विस्फारतील. रिपोर्टनुसार, रिहानाने अंबानींच्या सोहळ्यात ५२ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

आलिया भट्ट

या कार्यक्रमासाठी हॉलीवूड, बॉलीवूडच्या कलाकारांसह अनेक क्रीडापटूंनीहीदेखील उपस्थिती दर्शवली आहे. यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्यादेखील उपस्थित राहिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. मुंबई इंडियन्सचा दुसरा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवदेखील जामनगरमध्ये पोहोचला.

महेंद्रसिंह धोनी पत्नीसमवेत

याचबरोबर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानदेखील जामनगरमध्ये दाखल झाला आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी. कश्यप हे दाम्पत्यही आले आहे. झहीर खान हा पत्नी सागरिकासोबत उपस्थित होता. इशान किशनदेखील अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित आहे.

करीना कपूर-सैफ

रिहाना आज सकाळी रवाना

रिहाना भारतातून आपल्या मायदेशी जाण्यासाठी आद सकाळी विमानतळावर स्पॉट झाली. विमानतळावर आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाला सकाळी स्टायलिश अंदाजात कॅमेराबद्ध करण्यात आले.

Back to top button