‘मला ‘सीएसके’त घ्‍या’, कॉमेडी स्‍टारच्‍या मागणीवर धाेनीने दिले मजेशीर उत्तर…

‘मला ‘सीएसके’त घ्‍या’, कॉमेडी स्‍टारच्‍या मागणीवर धाेनीने दिले मजेशीर उत्तर…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महेंद्रसिंह धोनी ( MS Dhoni ) या नावाचे गारुड देशभरातील अबालवृद्धावर आहे. टीम इंडियाच्‍या या माजी कर्णधाराचा चाहता वर्ग प्रचंड आहे. 'आयपीएल'मध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍ज ( सीएसके ) संघाचे नेतृत्त्‍व करणार्‍या धोनीने साेमवारी ( दि. १०) पत्‍नी साक्षीबरोबर त्‍यांच्‍या पहिल्‍या तमिळ निर्मिती असणार्‍या 'लेट्स गेट मॅरीड' या चित्रपटाच्‍या ऑडिओ लॉन्‍च केला. या कार्यकम्रामध्‍ये दाक्षिणात्‍य चित्रपटातील कॉमेडी स्‍टार योगी बाबू (Yogi Babu) याने थेट 'सीएसके' संघात स्‍थान देण्‍याची मागणी केली. यावर धोनीने दिलेले उत्तर ऐकण्‍यासारखेच होते. ( MS Dhoni and Yogi Babu )

९ जुलै रोजी चेन्‍नई विमानतळावर धोनी आणि त्‍याची पत्‍नी साक्षीचे भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली. फुलांचा वर्षाव करत दोघांचे स्‍वागत करण्‍यात आले. सोमवार, १० जुलै रोजी 'लेट्स गेट मॅरीड' या चित्रपटाच्‍या  ऑडिओ आणि ट्रेलर लॉन्च चेन्नईमध्‍ये झाला. या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका असणार्‍या काॅमेडी स्‍टार योगी बाबू याने धोनीला चेन्नई सुपर किंग्ज संघात स्‍थान देण्‍याचे आवाहन केले. ( MS Dhoni and Yogi Babu )

आताच अंबाती रायडू निवृत्त झाला आहे…

योगी बाबूच्‍या मागणीवर धोनी म्‍हणाला की, चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघातून नुकताच अंबाती रायडू निवृत्त झाला आहे. त्‍यामुळे आमच्‍याकडे तुमच्‍यासाठी  एक जागा आहे. मी व्‍यवस्‍थापनाशी बोलतो; पण तुम्‍ही चित्रपटांमध्‍ये खूप व्‍यस्‍त असता. त्‍यामुळे तुम्‍हाला क्रिकेट खेळावे लागेल. दुसर असं प्रतिस्‍पर्धी खेळाडू खूप वेगवान गोलंदाजी करतात. फलंदाजाना दुखापत करण्‍यासाठीही त्‍यांची गोलंदाजी असते, असे सांगत त्‍याने योगी बाबूची 'सीएसके'त खेळण्‍याची संधी मिळणे एवढे साेपे नाही, अशी अप्रत्‍यक्ष समजूतही काढली.

तामिळ चित्रपट निर्मितीत साक्षीचे पदार्पण

महेंद्रसिंह धाेनीची पत्‍नी साक्षी हिने  'लेट्स गेट मॅरीड' या चित्रपटाची संकल्पना मांडली. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून ती तामिळ चित्रपट निर्मितीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन असणारा चित्रपट असून, ताे पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. यामध्‍ये हरीश कल्याण आणि इवाना हे मुख्य भूमिकेत आहेत. योगी बाबू आणि मिर्ची विजय सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. रमेश थमिलमणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२४ च्या प्रारंभी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news