यवतमाळ : गॅस सिलिंडरच्या स्फोटात गर्भवती महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

यवतमाळ : गॅस सिलिंडरच्या स्फोटात गर्भवती महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू
Published on
Updated on

घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत गर्भवती महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ही हदयद्रावक घटना पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (सदोबा) जवळ असलेल्या मौजा आयता या गावामध्ये आज (बुधवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यात गर्भवती महिला काजल विनोद जयस्वाल (वय ३०, रा. आयता) व मुलगी परी विनोद जयस्वाल (वय ८ ) या दोघींचा होरपळून मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, विनोद जयस्वाल हा बाहेरगावी गेला होता. घरामध्ये त्याची पत्नी व ८ वर्षांची मुलगी होती. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

दरम्यान, गावातील लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अनेक लोकांना किरकोळ इजा झाल्या. घरातील संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक बंब येईपर्यंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले, पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव गांवडे घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : "महिलांनी राजकारणात आलं पाहिजे" – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women's Day 2022

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news