WTC Final : अजिंक्य रहाणे कसोटी पुनरागमनासाठी सज्ज; म्हणाला, ‘माझ्या भूतकाळाचा..’

WTC Final : अजिंक्य रहाणे कसोटी पुनरागमनासाठी सज्ज; म्हणाला, ‘माझ्या भूतकाळाचा..’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  फलंदाज अजिंक्य रहाणेने तब्बल १८ महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे. त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. रहाणे या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी ट्रॉफी आणि आयपीएलप्रमाणे येथेही फलंदाजी करायची आहे, असे तो म्हणाला. (WTC Final)

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याला आयपीएलमधला फॉर्म कायम ठेवत फलंदाजी करायची आहे. भारताच्या सराव सत्रादरम्यान रहाणेने बीसीसीआय टीव्हीला सांगितले की, "मी १८-१९ महिन्यांनंतर पुनरागमन केले आहे. माझ्या भूतकाळाचा विचार करायचा नाही. मला नवीन सुरुवात करायची आहे. (WTC Final)

चेन्नई सुपरकिंग्जमध्ये लुटला आनंद

रहाणे म्हणाला, "मी वैयक्तिकरित्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा आनंद घेतला. कारण मी संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी केली. आयपीएलपूर्वी देशांतर्गत हंगामातही मी चांगली कामगिरी केली होती त्यामुळे मला चांगले वाटत आहे. त्यामुळे हे पुनरागमन माझ्यासाठी थोडे भावूक होते.

कसोटीतही आक्रमक फलंदाजी करेन

चॅम्पियन चेन्नईचा भाग असलेल्या रहाणेने त्याच्या आक्रमक फलंदाजीचे खूप कौतुक केले आहे आणि त्याला त्याच फॉर्मने फलंदाजी करायची आहे. तो म्हणाला, "मला इथे येण्यापूर्वी आयपीएल आणि रणजी ट्रॉफीमध्ये ज्या मानसिकतेने आणि भावनेने फलंदाजी करायची आहे. मला फॉरमॅटचा विचार करायचा नाही, मग तो टी-२० असो की टेस्ट मॅच. आता मी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, मी गोष्टी जितक्या सोप्या ठेवतो तितके ते माझ्यासाठी चांगले असते.

अजिंक्यने केले रोहित शर्माचे कौतुक

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्व कौशल्याचेही त्याने कौतुक केले. तो म्हणाला, "रोहित संघाचे उत्तम व्यवस्थापन करत आहे आणि राहुल (मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड) भाई देखील संघाचे नेतृत्व उत्तम प्रकारे करत आहेत. आणि संघातील वातावरण विलक्षण आहे. प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये इतिहासिक मालिका जिंकली होती. रहाणेने आतापर्यंत ८२ कसोटी सामन्यांमध्ये ४९३१ धावा केल्या आहेत.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news