Wrestler Sikandar Shaikh : तोच खरा ‘सिकंदर’…फडणवीसांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Wrestler Sikandar Shaikh : तोच खरा ‘सिकंदर’…फडणवीसांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेला अवघ्या १६ सेकंदात आसमान दाखवून मोहोळचा पैलवान सिकंदर शेख याने अखेर 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावला आहे.  पुण्यातील पुलगाव येथे झालेल्या चितपट करीत हा बहुमान त्याने पटकावला. यंदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. त्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन पोस्ट करत त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!" (Wrestler Sikandar Shaikh)

Wrestler Sikandar Shaikh : यावेळी मात्र तो…

सिकंदर शेख यांनी  दोन वेळा सिकंदर शेखला महाराष्ट्र केसरीच्या किताबाने हुलकावणी दिली होती. परंतु, यंदा मात्र गतविजेता शिवराज राक्षे याला चितपट करत यशाला गवसणी घातली आणि अखेर सिकंदर शेख हा 'महाराष्ट्र केसरी' झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतल्या पैलवानांचा खेळ. आपल्या महाराष्ट्राने देशाला अनेक नामवंत मल्ल दिले. त्यासाठी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे. पै. सिकंदर शेख याने यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत या मांदियाळीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्यावेळी सिकंदरला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली, पण यावेळी मात्र तो खऱ्या अर्थाने 'सिकंदर' ठरला. या यशाबद्दल सिकंदरचे खूप खूप अभिनंदन व त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!"

हमालाचा पोरगा झाला 'महाराष्ट्र केसरी'

"आज आमची इच्छा पूर्ण झाली, आनंद गगनात मावेना संपूर्ण महाराष्ट्राने माझ्या सिकंदरला प्रेम दिले." 'ना चिंता ना भय , नागनाथ महाराज की जय' अशी घोषणा देत नुकताच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविलेला सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख यांनी प्रतिक्रिया दिली. पैलवान सिकंदर शेख याचे चुलते व सर्वच कुटुंबीय यांची परिस्थिती साधारण आहे.सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख आज ही मोहोळ शहरातील मोठ्या किराणा दुकानात हमाली करतात. त्यामुळे आपला पोरगा महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news