World Radio Day : संवाद क्रांतीत मैलाचा दगड ठरलेला रेडिओ

World Radio Day : संवाद क्रांतीत मैलाचा दगड ठरलेला रेडिओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आपण टेक्नॉलॉजिमध्ये कितीही पुढे गेलो असलो आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये वैविध्यता आणली तरी 'रेडिओ' या श्राव्य माध्यमाची जी जादू आणि विश्वासाहर्ता आहे ती आजही टिकून आहे. रेडिओ हे संवादाचे जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून आजही पाहीले जाते. आज जागतिक रेडीओ दिन. पाहूया जागतिक रेडीओ दिनाचा इतिहास. (World Radio Day )

World Radio Day जागतिक रेडिओ दिन, काय आहे २०२२ ची थीम

संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी एक थीम ठरवते. २०२२ यावर्षीची थीम ही 'Radio and Trust' अशी ठेवली आहे. तर २०२१ सालची जागतिक रेडिओची थीम ही 'New World, New Radio' होती. रेडीओने काळानुसार आपल्या माहिती प्रसारात लवचिकता ठेवली आहे. आणि हेही तितकेच खर आहे की रेडिओने आपली विश्वासाहर्ताही जपली आहे. हा दिवस जगात २०१२ पासून साजरा करण्यास सुरूवात झाली. रेडिओ असे माध्यम आहे की जे लोकांना वेगवेगळ्या स्वरूपाची विश्वासपूर्ण माहीती देते. खासकरून गाव, वाड्या, वस्त्या जिथे माहीती आणि मनोरंजनाची साधने पोहोचत नाही. अशा ठिकाणी रेडिओची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.  

भारत आणि रेडिओ

सध्याच्या घडीला भारतात सुमारे  ४१५ सामुदायिक प्रसारण केंद्रे आहेत. (Cammunitry Radio) देशात १९२३ मध्ये रेडिओ ब्रॉडकास्टला सुरूवात झाली. १९३६ साली भारतात सरकारी 'इम्पेरियल रेडीओ ब्रॉडकास्ट' सुरूवात झाली. स्वातंत्र्यानंतर १९५७ सालापासून  आकाशवाणी 'ऑल इंडीया रेडिओ' म्हणून ओळखू लागले. हे नाव प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. (म्हैसूर संस्थानाने रेडिओ-केंद्रास 'आकाशवाणी' हे नाव दिले होते) २००१ पासून भारतात खासगी रेडिओ स्टेशनलाही सुरुवात झाली. इंटरनेटच्या जगात माहीती आणि मनोरंजनाचा मारा होत असला तरी रेडिओ आजही आपली जादू टिकवून आहे. 

मार्कोनीने १८९५ साली बनविलेल्या  रेडीओने संवाद क्रांतीत अमुलाग्र बदल घडवून आणला. पूर्वीच्या AM वरुन ते FM रेडिओचा प्रवास हा थक्क करणारा आहे. 

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news