World Population : जगाची लोकसंख्या लवकरचं ८ बिलियनचा आकडा पार करणार : UN चा अहवाल 

World Population
World Population

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या  १५ नोव्हेंबर नंतर ८ बिलियनचा आकडा पार करेल. हा आकडा नक्कीच जगाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. ही लोकसंख्या अशीच वाढत (World Population) राहणार आहे. येत्या काही दशकात ही लोकसंख्या मंद गतीने वाढत राहील. लोकसंख्या वाढीत प्रादेशिक असामानता असेल. २०२३ पर्यंत ही संख्या ८.५ अब्जांपर्यंत पोहोचू शकते. असाही अंदाज वर्तवला आहे. वाचा संयुक्त राष्ट्राचा अहवाल काय सांगतो.

World Population : येत्या दशकात जगाची लोकसंख्या वाढत राहील

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार येत्या काही दशकात जगाची लोकसंख्या ही वाढतचं राहील. सरासरी आयुर्मान वाढतच आहे.  २०५० पर्यंत ही संख्या ९.७ अब्जापर्यंत जाईल. २०२२ मध्ये  जागतिक लोकसंख्यामध्ये ६५ वर्षे असलेल्यांची टक्केवारी १० % आहे. तर हीच टक्केवारी २०५० पर्यंत १६ % पर्यंत जावू शकते असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असही म्हंटलं आहे की, २०३० मध्ये लोकसंख्या सुमारे ८.५ अब्ज, २०५० मध्ये ९.७ अब्ज आणि २०८० मध्ये सुमारे १०.४ अब्ज एवढी वाढेल.

या कालखंडात वाढली जगाची लोकसंख्या

जागतिक महामारी कोरोनाचा सर्वच घटकांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. अजूनही याचे परिणाम लोकांवर होत आहेत. या काळात लोकसंख्यावाढीवर खूप परिणाम झाल्याचे विविध अभ्यास सांगत आहेत. मृत्यूदरात घट झाल्याने २०५० साली सरासरी जागतिक दीर्घायुष्य साधारणत: ७७.२ वर्षे असेल असा अंदाज वर्तवला आहे. जगभर कोरोना विषाणूमुळे गर्भधारणा आणि जन्मदरावर परिणाम झाला. सारासर विचार करता १९५० ते २०२२ या कालखंडात जगाची लोकसंख्या तब्बल तीनपटीने वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

१९६० च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झाला असं यूएन पॉप्युलेशन फंडच्या रेचेल स्नो यांनी सांगितले.

लोकसंख्या बाबतीत भारताचा पहिला नंबर? 

सद्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा एक नंबरवर आहे तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ ला भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असेल. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर असेल. ही बाब भारतासाठी चिंताजनक असेल. सध्या चीनची लोकसंख्या पाहता ती सुमारे १.४ अब्ज आहे ती २०५० पर्यंत ती १.३ अब्जावर राहील,  असं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news