World Emoji Day 2023 | ‘इमोजी’ची सुरुवात कधी झाली? इमोजी म्हणजे काय?; जाणून घ्या अधिक

World Emoji Day 2023 | ‘इमोजी’ची सुरुवात कधी झाली? इमोजी म्हणजे काय?; जाणून घ्या अधिक

 पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक इमोजी दिवस २०२३ (World Emoji Day 2023) हा दरवर्षी १७ जुलै रोजी साजरा केला जातो. ऑनलाइन चॅटिंगच्या जगात इमोजीचे वेगळे महत्त्व आहे. आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज ७ अब्जाहून अधिक वेळा इमोजीचा वापर केला जातो. युनिकोड स्टँडर्डमध्ये साडेतीन हजारांहून अधिक इमोजी आहेत. ज्यामध्ये स्किन टोन, ध्वज आणि कीकॅपसह विविध प्रकारच्या इमोजींचा समावेश आहे. जाणून घेऊया इमोजीबाबत अधिक माहिती.

इमोजी म्हणजे काय? | What emoji does ? mean?

सध्याच्या ऑनलाईन चॅटिंगमध्ये स्वतःला थोडक्यात व्यक्त करण्यासाठी इमोजींचा वापर केला जातो. इमोजी हे एक जपानी पोर्टमँटेउ (portmanteau) म्हणजे मिश्र रचना आहे. ज्यामध्ये 'e' म्हणजे 'चित्र' आणि 'मोजी' म्हणजे 'कॅरेक्टर'. म्हणजेच चित्राद्वारे एखादा शब्द किंवा भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे याला 'इमोजी' म्हणतात. (World Emoji Day 2023)

जागतिक इमोजी दिनाचा इतिहास | Where did emoji day come from?

सर्वप्रथम, १९९९ मध्ये, जपानी मोबाइल ऑपरेटिंग कंपनीच्या अभियंता शिगेताका कुरिता यांनी इमोजी तयार केले. मोबाईल इंटिग्रेटेड सेवा आय-मोड रिलीझ करण्यासाठी त्यांनी १७६ इमोजी तयार केल्या होत्या. त्यानंतर २०१० मध्ये, युनिकोडने इमोजीचा सर्वात विकसित रुप सर्वांसमोर आणले. त्यानंतर, Google, Microsoft, Facebook आणि Twitter सारख्या जागतिक ब्रँड्सनी इमोजीच्या स्वतःच्या आवृत्त्या तयार करण्यास सुरुवात केली.

२०१२-२०१३ मध्ये इमोजींचा वापर सर्वात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. दरम्यान, इमोजी इतक्या लोकप्रिय झाल्या की ऑगस्ट २०१३ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'इमोजी' या नव्या शब्दाची भर पडली. २०१४ मध्ये, इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी इमोजीचा प्रसार वाढविण्यासाठी 'जागतिक इमोजी दिन' साजरा करण्यासाठी एक तारीख निश्चित केली. ही तारीख तंत्रज्ञान जगतासाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. कारण कोणत्याही शब्दांशिवाय एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याची कला यामुळे अवगत झाली.

पहिला इमोजी कोणता? | What was the first emoji?

NTT DOCOMO (एक जपानी मोबाईल फोन ऑपरेटर) यांच्याकडे 'पॉकेट बेल' (Pocket Bell) नावाचे एक अतिशय यशस्वी पेजर होते. ज्यांनी पहिले इमोजी प्रदर्शित केले होते. हे पहिले इमोजी 'हार्ट' दर्शविणारे होते. त्यांनी मोबाईल इंटरनेट-आय-मोड नावाच्या सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म विकसित केला. जपानमधील अॅप मार्केट कडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी या सॉफ्टवेअरचा आधार घेतला. यातून पुढे इमोजींचा प्रसार होऊ लागला.

एका रिपोर्टनुसार, हे 10 इमोजी सोशल मीडियावर सर्वाधिक वापरले जातात –

? आनंदाश्रू असलेला चेहरा
❤️ प्रेमळ हृदय
? हसू आवरत नाही
? थंब्स अप
? रडणारा चेहरा
? विनंती, माफी
? चुंबन
? मनातून आनंदी किंवा हसणारा चेहरा
? डोळ्यातील प्रेमळ भावना दर्शविणारा, हसरा चेहरा
? हसऱ्या डोळ्यांचा हसरा चेहरा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news