World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन

वर्ल्ड ऑल्म्पिक डे www.pudhari.news
वर्ल्ड ऑल्म्पिक डे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'वर्ल्ड ऑलिम्पिक डे'चे औचित्य साधून मविप्र संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.23) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकापासून सकाळी 7 वाजता सुरू होणार्‍या एक किलोमीटरच्या रनमध्ये पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अविनाश टिळे, महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, मीनाक्षी गायधनी आदी सहभागी होणार आहेत. तर मविप्र संस्थेच्या शाखा पातळीवर घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऑलिम्पिक डे रन यशस्वीतेसाठी मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news