‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द

Word Of The Year 2023
Word Of The Year 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर म्हणून 'रिझ'(RIZZ) हा नवीन शब्द समाविष्ट केला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एखाद्याला व्यक्तीला आकर्षित करण्याच्या क्षमतेचे वर्णन किंवा व्यक्तिला मोहात पाडण्यासाठी 'RIZZ' हा शब्द लोकप्रिय संकल्पना असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'द हिंदू'ने दिले आहे. (Word Of The Year 2023)

'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रकाशक तज्ज्ञांच्या निर्णयामध्ये 'रिझ'(RIZZ) शब्दांसह स्विफ्टी (Swiftie-टेलर स्विफ्टचा उत्साही चाहता), परिस्थितीजन्य (situationship-अनौपचारिक रोमँटिक किंवा लैंगिक संबंध) आणि प्रॉम्प्ट (Prompt-कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रमाला दिलेली सूचना) हे देखील शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. (Word Of The Year 2023)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने सार्वजनिक मतदानाद्वारे चार विजेत्यांची सोमवारी नावे देखील घोषित  केली. या विजेत्यांनी या वर्षाच्या ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट शब्दांची निर्मिती केली आहे. Rizz हा शब्द हिंदीतील करिश्मा या शब्दाच्या मध्यातून आला आहे असे मानले जाते. याचे 'Rizz Up' असेही क्रियापद (एखाद्याशी गप्पा मारणे) वापरले जाते, असे प्रकाशनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Word Of The Year 2023)

Word Of The Year 2023: डिक्शनरीमध्ये या 8 शब्दांचा नव्याने समावेश

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 2023 साठी 'रिझ' हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला गेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्ड ऑफ द इयरच्या यादीमध्ये रिज – सिच्युएशनशिप, स्विफ्टी, प्रॉम्प्ट, सीड फ्लॅग, डी-इंफ्लुएंसिंग, हीट डोम आणि पॅरासोशियल यासह 8 शब्दांचा समावेश आहे. 2200 कोटी शब्दांच्या विश्लेषणाच्या आधारे हे आठ शब्द निवडण्यात आले आहेत. हे शब्द 2023 मध्ये झालेले सामाजिक बदल आणि ट्रेंड दर्शवतात. 2022 मध्ये, ऑक्सफर्डने गोब्लिन मोडला वर्षातील शब्द म्हणून निवडले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news