Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर रोहित पवार यांचे सूचक विधान

Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर रोहित पवार यांचे सूचक विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's Reservation Bill : विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल (दि.१९ सप्टेंबर) मोठ्या दिमाखात नव्या संसद भवनात प्रवेश करण्यात आला. यानंतर नव्या संसद भवन इमारतीत महिला आरक्षण विधेयकाने संसदेच्या कामकाजाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर या विधेयकावरून राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. या विधेयकाविषयी प्रतिक्रिया देताना, केंद्राच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी 'X' वर सूचक पोस्ट केली आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवूनही महिला आरक्षण आता नाही तर २०२६ पर्यंत लागू होणार असेल तर याचे दोनच अर्थ निघतात. (Women Reservation Bill)

 Women's Reservation Bill : लोकसभा निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार

रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये  म्हटले आहे की, पुढे रोहित पवार म्हणाले, संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारप्रमाणे 'बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं' अशाप्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते किंवा लोकसभेच्या निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलून 'वन नेशन, वन इलेक्शन' च्या नावाखाली विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याचा विचार सरकारचा असू शकतो, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news