ढारी ऑनलाईन डेस्क : गेले दोन दिवस भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबधित केलेले वक्तव्य चर्चेत आहे. या अनुषंगाने भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य कसे चालायचे असा सवाल केला, "संजय राऊत यांना मुक्त सहमती होती का??" (Nitesh Rane vs Sanjay Raut)
संबधित बातम्या
नितेश राणे यांनी 'X' अंकाऊंटवर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान. मग महाविकास आघाडीमध्ये दादा असताना संजय राऊत ऊठसूठ दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग? गोपीचंद पडळकरआणि संजय राऊत यांना वेगळा न्याय का? संजय राऊत यांना मुक्त सहमती होती का??"
आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवार यांना मुळात आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आरक्षणाबाबत मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली हाेती. अजित पवारांची आमच्याबाबतची भूमिका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पडळकरांच्या या टीकेवर अजित पवार यांनी मौन बाळगले अहे. मात्र त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना आवरावे. या मंगळसूत्र चोराला बारामतीच्या लोकांनी आधीच त्यांची पात्रता दाखवून दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.