Asian Games 2023 : हाॅकीमध्‍ये भारतीय महिला संघाची कांस्‍यपदकाला गवसणी

Asian Games 2023 : हाॅकीमध्‍ये भारतीय महिला संघाची कांस्‍यपदकाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : हाॅकीच्‍या उपांत्‍य फेरीत चीनकडून पराभूत झालेल्‍या टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आज (दि.७) पुन्‍हा कमबॅक केले. जपानला २-1 असे पराभूत करत कांस्‍य पदक आपल्‍या नावावर केले.

महिला हॉकीच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारतासमाेर जपानचे आव्‍हान हाेते. सामन्‍याच्‍या आठव्‍या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या संधीचे दीपिकाने गोलमध्‍ये रुपांतर करुन टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र जपानने हाफ टाइमपर्यंत १-१ अशी बरोबरी साधली. (Asian Games 2023 ) अत्‍यंत चुरशीच्‍या झालेल्‍या सामन्‍यात अखेरची दहा मिनिटे शिल्‍लक असताना भारताच्‍या चान्‍नूने पेनल्टी स्ट्रोकवर भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. अखेर ही आघाडी कायम ठेवत भारताने जपानला २-1 असे पराभूत करत कांस्‍य पदक पटकावले.

कर्णधार सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत 10 व्या क्रमांकावर असलेल्या यजमान चीनविरुद्ध ४-० असा पराभव पत्करावा लागला हाेता. याआधी भारताने ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करत चारपैकी तीन सामने जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले होते. भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सहा पदके जिंकली असून त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि जपान 

जकार्ता २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि जपान आमने-सामने आले होते. त्यावेळी जपानने २-१ ने विजय मिळवला होता. तर इंचॉन २०१४ येथे कांस्यपदकाची लढत भारताने २-१ ने जिंकली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news