पुढारी ऑनलाईन : बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट ( #RRR movie ) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. परंतु, 'आरआरआर' येताच बहुचर्चित 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याची माहिती मिळाली आहे. एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' ( #RRR movie ) हा चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'ला सध्या टक्कर देत आहे. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाने गेल्या १५ दिवसांत एकूण २११.८३ कोटींची कमाई केली आहे. परंतु, 'आरआरआर' चित्रपट थेअटरमध्ये येताच कश्मीर फाइल्सचे कलेक्शन कमी झाले आहे.
नुकतेच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. यात त्यांनी 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाने शुक्रवारी फक्त ४.५० कोटींची कमाई केली आहे. ही आकडेवारी आजपर्यतची सर्वात कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच दिवशी दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट रिलीज झाला. यामुळे कश्मीर फाइल्सच्या कमाईत घट झाली आहे. तर गुरुवारी चित्रपटाने ७.२० कोटींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण २११. ८३ कोटींची कमाई केल्याचे सांगितले आहे.
याशिवाय त्यांनी सुट्टीच्या दिवशी म्हणजे येत्या शनिवार आणि रविवारी द कश्मीर फाइल्स'च्या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. चित्रपटाची वाढती कमाई पाहता लवकरच हा चित्रपट ३०० कोटींच्या घरात पोहोचेल असे त्यांनी म्हटले आहे. याआधी 'द कश्मीर फाइल्स' ने अवघ्या ५ दिवसात ५० कोटींचा, सहाव्या दिवशी ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठव्या दिवशी १०० कोटी, १० दिवशी १५० कोटी, ११ दिवशी १७५ कोटी आणि १३ व्या दिवशी २०० कोटींपर्यंत आकडा पार केला आहे.
सुमारे १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या काश्मीर फाइल्सने आतापर्यंत आपल्या बजेटच्या २० पट कमाई केली आहे. हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरणार आहे. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि पलायन या सत्य घटनांवर आधारित आहे.
हेही वाचलंत का?