ITI Admissions 2023: आयटीआयमध्ये ‘इलेक्ट्रीशियन, वायरमन’लाच डिमांड

ITI Admissions 2023: आयटीआयमध्ये ‘इलेक्ट्रीशियन, वायरमन’लाच डिमांड

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'इलेक्ट्रीशियन' आणि वायरमन म्हटले की हमखास नोकरी… या इराद्याने आयटीआयला अर्ज भरलेल्यापैकी निम्या विद्यार्थ्यांनी 'इलेक्ट्रीशियन' तर त्याखालोखाल वायरमन ट्रेडलाच प्रवेश मिळावा, यासाठी आपल्या अर्जात पसंतीचा ऑप्शन भरल्याचे दिसून येत आहे. राज्यातील आयटीआयमधील असलेल्या 20 हजार 'इलेक्ट्रीशियन' जागांसाठी तब्बल 1 लाख 57 हजार 730 जणांनी पसंतीक्रम दर्शवला आहे. तर त्या पाठोपाठ वायरमन ट्रेडला 92 हजार विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयटीआयमध्ये 86 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यातील दहावी पास व नापास विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम आहेत. आयटीआयकडून अभियांत्रिकी विषयाचे एक वर्ष, दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम आणि बिगर अभियांत्रिकी असे अभ्यासक्रम आहेत. गेल्या काही वर्षात 'आयटीआय' प्रवेशाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत. इलेक्ट्रीशियन, फिटर, मशिनिस्ट डिझेल, मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत.

उद्योगक्षेत्रात नोकरीची हमी असल्याने याच ट्रेडकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना यंदा प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. 'फिटर' आणि 'वेल्डर' अभ्यासक्रमांनाही डिमांड यावर्षी वाढला आहे. शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्याचे दिसून आले. यामुळे एका जागेसाठी दावेदार मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम केले आहेत. यापैकी निम्याहून अधिक विद्यार्थ्यांनी टॉप टेन ट्रेडला अधिक पसंती दर्शवली आहे. ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटोलॉजी, फॅशन टेक्नोलॉजी, सिविंग टेक्नोलॉजी यासारख्या अभ्यासक्रमांना मुलींनी पसंती दर्शवली असली तरी इलेक्ट्रीकल, वायरमन सारख्या अभ्यासक्रमांनाही मुलींनी पसंती दर्शवली आहे.

अशी आहे विद्यार्थ्यांची ट्रेडनुसार पसंती…

इलेक्ट्रिशियन – 157703

वायरमन – 92507

फिटर – 92127

मेकॅनिक मोटर वाहन – 67734

मेकॅनिक डिझेल – 62215

वेल्डर – 52545

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट- 47783

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 44200

मशीनिस्ट – 26153

टर्नर – 20648

रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ – 20633

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल – 11796

मेकॅनिक ट्रॅक्टर- 10808

प्लंबर – 10250

ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – 7306

सुतार – 7118

ड्राफ्ट्समन सिव्हिल – 7077

ड्रेस मेकिंग- 6968

शीट मेटल वर्कर – 5583

मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स – 5562

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 5024

मशिनिस्ट ग्राइंडर – 4359

शिवणकाम – 4300

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news