![Winter Diet](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2FCopy-of-Copy-of-Untitled-Design-2-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हवामानात बदल व्हायला सुरूवात झाली आहे. हवामानातील बदलानुसार शरीरातही बदल होतात. त्वचा कोरडी पडणे किंवा फुटणे, कमी तहान लागणे किंवा भूक जास्त लागणे यांसारखे वरकरणी बदल जाणवू लागतात. हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आपल्या शरीरात अंतर्गत बदल देखील होतात. या बदलांचा सामना करण्यासाठी आपला आहारही (Winter Diet) तसाच हवा.
इतर ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये अन्नपचन चांगले हाेते. त्यामुळे वारंवार भूकही लागते. हा ऋतू जसा शारीरिक कवायतींसाठी उत्तम असतो, तसा पचनासाठी देखील उत्तम असतो. त्यामुळे या काळात तुमचे वजन देखील वाढू शकते. त्यामुळे हिवाळ्यात उबदार पदार्थांचा आहारात (Winter Diet) समावेश करणे; हे गरजेचे असते.