lemon Water Benefits : कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिल्याने हे होतात जबरदस्त फायदे | पुढारी

lemon Water Benefits : कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिल्याने हे होतात जबरदस्त फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उन्हाळा, पावसाळा असो वा हिवाळा प्रत्येक ऋतूत सेवन केलं जाणारं पेय म्हणजे लिंबू पाणी; पण तुम्हाला माहित आहे का? कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून सकाळी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबू, मधाबरोबरच काळी मिरी किंवा काळ मीठ घालून सुद्धा पिऊ शकता. याच्‍या फायदे जाणून घेवूया. (lemon Water Benefits)

वजन कमी होण्यास मदत होते

तुमचं वजन वाढलं आहे आणि तुम्हाला जर वजन कमी करायचे आहे. तर दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबूचा रस आणि मध घालून प्यायला सुरुवात करा. यामुळे तुमची पचन प्रक्रिया सुधारते. शरीराचे मेटाबॉलिज्म ठीक राहते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. वजन कमी होण्यास मदत मिळते.

lemon Water Benefits : सतेज त्वचा

लिंबूत असलेलं व्हिटॅमिन सी (Vitamin C ) हे मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हीटॅमिनचा आहारात वापर जास्त केल्याने त्वचेला सुरुकुत्या येण्याची शक्यता कमी असते. लिंबू पाणी पिल्याने आपली त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते. जर का तुम्हाला तुमच्या त्वचेला सुरुकत्या नको असतील तर जरुर कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या.

lemon Water Benefits : यकृताचे कार्य सुधारते.

लिंबू रस, मध आणि कोमट पाणी पिल्याने यकृताचे कार्य सुधारते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी जे अँटिऑक्सिडेंट आहे. ते यकृत पेशींना नुकसानीपासून प्रतिबंधित करण्यास मदत करते.

टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत

शरीरातील साचलेले हानिकारक कण आणि टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी कोमट पाणी, मध आणि लिंबू यांचे सेवन खूप गुणकारी आहे. लिंबू पाण्याने इन्फेक्शन कमी होते आणि आपण पोटाच्या तक्रारी पासून दूर राहतो. यासाठी कोमट पाणी, मध आणि लिंबू यांचे सेवन सकाळी करा.

पचनक्रिया व्यवस्थित राहते 

तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल. या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडासा मध आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण प्यावे. यामुळे पोट साफ राहते. लिव्हर चांगले राहते आणि अन्न पचण्यास मदत होते. मधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका

अलिकडच्या काही दिवसांत बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहेत. जर का या यादीत तुम्ही असाल तर कोमट पाणी, लिंबुचा रस आणि मध यांच मिश्रण बद्धकोष्ठतेपासून सुटका करण्यास नक्की मदत करते.

हेही वाचलंत का?

Back to top button