महिला पुरुषांपेक्षा कमी आनंदी असतात! जाणून घ्‍या नवे सर्वेक्षण काय सांगते?

महिला पुरुषांपेक्षा कमी आनंदी असतात! जाणून घ्‍या नवे सर्वेक्षण काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्वाधिक आनंदी कोण असतं महिला की पुरुष?, तुम्‍हाला वाटेल हा काय प्रश्‍न आहे. मनाला हाेणार्‍या आनंदाचा माेजमाप करताना थोडचं महिला आणि पुरुष असं काही असतं?, आपल्‍या मनाला होणारा आनंद हा लिंगनिहाय कसा विचार होवू शकतो? असे प्रश्नही तुमच्या मनात आले असतील. मात्र अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महिला पुरुषांपेक्षा कमी आनंदी असतात, असे निदर्शनास आले आहे. ( Women are less happy than men ) हे सर्वेक्षण 'The Conversation'ने प्रसिद्ध केले आहे. तसेच महिलांनी वाढत्‍या मानसिक तणावावर कोणते उपाय करावेत याबाबतही मार्गदर्शन केले आहे.  (Women and Happiness) हे सर्वेक्षण अमेरिकेतील असले तरी मागील काही वर्षांमध्ये महिलांच्‍या मानसिक आरोग्‍यामध्‍ये झालेल्‍या बदलाचे परिणाम अनेक देशांमध्ये आणि विविध वयोगटांमध्ये दिसतात. म्‍हणून या नवीन सर्वेक्षणात नेमकं काय म्हटलं आहे हे जाणून घेवूया…

आज सर्वच क्षेत्रांमध्‍ये महिलांचे योगदान लक्षणीय आहे. कुटुंबाची जबाबदारी संभाळताना बाहेरील जगातही महिला तेवढ्याच सक्षमपणे आपले असित्‍व सिद्ध करत आहेत. मागील काही दशकांमध्‍ये महिलांना मिळालेले सामाजिक स्वातंत्र्याचाही हा परिणाम आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे महिलांना रोजगाराच्‍या संधीमध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता त्याचे जसे सकारात्‍मक परिणाम आहेत तसेच नकारात्‍मकही परिणाम दिसत आहेत. ( Women are less happy than men )

Women and Happiness : महिलांसमोर मानसिक संतुलन ठेवण्‍याचे आव्‍हान

अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्‍या सर्वेक्षणात आढळले की , नोकरीबरोबर कुटुंबाचीही जबाबदारी संभाळणार्‍या महिलांमध्ये उच्च पातळीवरील चिंता आणि मानसिक संतुलन कायम ठेवण्‍याचे आव्‍हान निर्माण होते.त्‍यामुळे त्‍यांना नैराश्य, चीडचीड, एकाकीपणा आणि अस्वस्थ झोप अशा आव्‍हानांचा सामना पुरुषांच्‍या तुलनेने अधिक करावा लागत आहे.

कुटुंब आणि नोकरी दुहेरी भारामुळे महिलांची कसरत

अनेक कुटुंबामध्‍ये घरातील मुले आणि वृद्ध नातेवाईकांची जबाबदारी ही प्रामुख्‍याने महिलांवरच असते. त्‍यांच्‍यावर नोकरीआणि कुटुंब व्यवस्था सांभाळण्याचा दुहेरी भार असतो. कामाचा तणावाबरोबरच कुटुंबाच्‍या जबाबदारीमुळे महिलांच्‍या आरोग्‍यावर मोठा परिणाम होत असल्‍याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. कुटुंब आणि नाेकरी या दाेन्‍ही ठिकाणी असणार्‍या तणावाचा परिणाम हा पुरुषांपेक्षा महिलांच्‍या शारीरिक व मानसिक आराेग्‍यावर अधिक हाेताे, असेही अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने  केलेल्या सर्वेक्षणात आढळले अआहे.

Women and Happiness : सामाजिक असमानतेमुळे आरोग्‍यावर परिणाम

अलीकडील अभ्यासाने असे सुचवले आहे की, ज्‍या महिलांचा जीवनातील उद्देश स्‍पष्‍ट असेल त्‍यांचे शारीरिक व मानसिक आरोग्‍य चांगले राहते. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, स्त्रिया अधिक परोपकारी प्रयत्नांमध्ये सक्रीय असतात. महिला सांस्कृतिक नियमांशी जोडलेले असल्‍याने त्‍यांच्‍या जीवनात अर्थाची जाणीव पुरुषाच्‍या तुलनेने प्रबळ असते. मात्र मोठ्या सामाजिक असमानतेला सामोरे जावे लागत असल्‍याचा परिणाम महिलांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर होत आहे.

महिलांनी आपल्‍या मानसिक आणि शारीरिक आरोग्‍य निरोगी ठेवण्‍यासाठी 'The Conversation' च्‍या लेखात चार उपायही सूचविण्‍यात आले आहेत. ते खालील प्रमाणे…
१) भावना व्‍यक्‍त करा

आपल्‍या भावना व्‍यक्‍त करणे हे कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या मानसिक आरोग्‍यासाठी महत्त्‍वाचे असते. महिलांना आपल्‍या भावना व्‍यक्‍त करण्‍याचे व्‍यासपीठ उपलब्‍ध करुन दिल्‍यास त्‍याच्‍या मनातील लज्‍जास्‍पद भावना कमी होवू शकते. त्‍यामुळे महिलांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त कराव्‍यात. यामुळे त्‍यांचे मानसिक आरोग्‍य निरोगी राहण्‍यास मदत होते. मागील काही वर्षामध्‍ये महिलांच्‍या जगण्‍यातील जबाबदारीत माेठी वाढ झाली आहे. त्‍यामुळे अनेकवेळा मानसिक कुंचबणा हाेते. विविध प्रश्‍नी अबाेल राहिल्‍याचा गंभीर परिणाम महिलांच्‍या आराेग्‍यावर हाेताे.

२) निसर्गाच्‍या वातावरणात राहा

महिलांनी आपले मानसिक व शारीरिक आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी दिवसातील काही वेळ निसर्गाच्‍या सानिध्‍यात राहणे खूपच फायदेशीर ठरते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, निसर्गाच्‍या सानिध्‍यातील महिला आपल्‍यावरील मानसिक आघात आणि शारीरिक आजारांवर लवकर मात करतात. कारण महिलांचे मूल्ये अनेकदा नैसर्गिक जगाशी जुळतात. "मदर अर्थ" ही संज्ञा जीवन देणारी आणि पालनपोषण करणारी स्त्रीची प्रवृत्ती दर्शवते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन किंवा साप्ताहिक योजनांमध्ये निसर्गाच्या सानिध्‍यात राहण्‍यासाठी वेळ काढा यासाठी नियोजन करा. समुद्र किनाय्‍यावर फिरणे, जंगल सफारी किंवा एखाद्‍या बागेत पुस्तक वाचणे, हे महिलांच्‍या मानिसक आरोग्‍य निरोगी राखण्‍यासाठी मदत करते.

3) नियमित व्‍यायाम हवाच

नियमित व्‍यायाम हा सर्वांसाठीच आवश्‍यक आहे. मात्र एरोबिक व्यायाम महिलांच्‍या वयानुसार संज्ञानात्मक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शारीरिक कसरती आणि धावणे यासारखे व्यायाम मध्यम वयातील महिलांचे हाडांचे आरोग्य सुधारतात. तसेच नियमित चालण्‍याचा व्‍यायाम हा रजोनिवृत्ती महिलांचे मानसिक आरोग्‍य लक्षणे सुधारत असल्याचे दिसून आले आहे.त्‍यामुळे महिलांनी नियमित व्‍यायामाचा आपल्‍या जीवनशैलीत समावेश करणे आवश्‍यक आहे.

४) अल्‍कोहोलपासून लांब राहा

महिलांमध्‍ये मद्य (अल्‍कोहोल) सेवनाचे प्रमाण कमी आहे. मात्र अल्‍कोहोल सेवन करणार्‍या महिला हिंसेला बळी पडण्‍याचा धोका अधिक असतो. नियमित मद्यपान करणार्‍या महिलांना हृदयरोग आणि स्तनाचा कर्करोग होण्‍याचा धोका अधिक असतो. तसेच मद्यपानामुळे महिलांच्‍या सुरक्षेचे प्रश्‍नही निर्माण होतात. महिलांनी अल्कोहोलपासून लांब राहणे हे त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news