विराटला मी शुभेच्छा का देऊ? ‘या’ खेळाडूचे अजब विधान

विराटला मी शुभेच्छा का देऊ? ‘या’ खेळाडूचे अजब विधान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने रविवारी ईडन गार्डन्सवर ६५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने आपला आयकॉन सचिन तेंडूलकरच्या ४९ वन डे शतकांची बरोबरी केली. विराटने २७७ डावात हा टप्पा गाठला. आता चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेट संघाला आशा आहे की, विराट या विश्वचषकात शतकांचे अर्धशतक झळकावेल आणि असे करणारा तो जगातील पहिला खेळाडू होईल. दरम्यान, विराटच्या या कामगिरीनंतर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने अजब विधान केले आहे.

संबंधित बातम्या : 

मेंडिसची अजब प्रतिक्रिया

कोहलीच्या या चमकदार कामगिरीनंतर अनेक माजी खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने विराटबाबत अजब प्रतिक्रिया दिली आहे. आज (दि.६) दिल्लीत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यापूर्वी त्याने रविवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. तेव्हा मेंडिसला माध्यम प्रतिनिधींनी विचारले की, कोहलीला त्याच्या ४९ व्या वनडे शतकाबद्दल अभिनंदन करायचे आहे का? यावर मेंडिस म्हणाला, "मी त्याला का शुभेच्छा देऊ?" मेंडिसने उत्तर दिले आणि हसायला लागला. या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर मेंडिसच्या या प्रतिक्रियेची खिल्लीही उडवली जात आहे.

वाढदिवसादिवशी झळकावले शतक

विराटने हा विक्रम त्याच मैदानावर केला आहे, जिथे त्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. सचिन तेंडुलकरच्या १०० शतकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज आहे. वाढदिवसाच्या दिवशी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो सामील झाला आहे. या खेळाडूंमध्ये सचिन, विनोद कांबळी, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये आपल्या वाढदिवसादिवशी शतक करणारा तो पहिला भारतीय आणि एकूण तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी मिचेल मार्श आणि रॉस टेलर यांनी ही कामगिरी केली आहे.

विराटने १०१ धावांची इनिंग खेळली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकून वनडे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १२१ चेंडूत १० चौकार आणि ८३.४७ च्या स्ट्राईक रेटच्या मदतीने १०१ धावा केल्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news