बेळगावसाठी नवस करायला आसामला का जात नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना

 उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन : बेळगावसाठी देखील नवस करायला आसामला का जात नाही? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्‍यमंत्री  शिंदे सरकारमधील आमदारांवर निशाना साधला. बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी आज हाती शिवबंधन बांधत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "जे गेले ते काही तुटपुंजे होते; पण आज माझ्यासोबत जुने आणि जानते शिवसैनिक आहेत. त्यामुळे आमचा पक्ष फुटला नाही तर दिवसेंदिवस वाढतोय". आम्ही आमच्या सरकारमध्ये जनतेच्या हिताची कामे केली आहेत. आज मात्र या सरकारकडून केवळ योजनांचा केवळ गाजावाजा होतोय. आम्ही आमच्यावेळी आममतलबीपणी कधी केला नसल्याचे ते म्हणाले. शिंदे आणि फडणवीस सरकारच्या निर्णयावर हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरविले गेले पाहिजेत. या प्रश्नावर भाजपमधील शिवाजी महाराज प्रेमींनी एकत्रित आले पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना मी आयोध्येत महाराष्ट्र भवनची घोषणा केली होती. तिच घोषणा आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. आपलं आणि कर्नाटकचं नातं काय आहे? असा सवालही त्‍यांनी यावेळी उपस्‍थित केला.

हेही  वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news