द काश्मीर फाईल्स यू-ट्यूबवर दाखवा, टॅक्स फ्रीची गरज काय?; केजरीवाल संतप्त

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट द कश्मीर फाईल्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यासारख्या दिग्गज स्टार्सनी काम केलं आहे. बॉक्स ऑफिसवर द कश्मीर फाईल्सची खूप कमाई होत आहे. तर स्टार्सच्या भूमिका, त्यांचा अभिनयदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा, केजरीवाल म्हणाले…

देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपट द कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. हरियाणा ते गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट टॅक्स करण्यात आला आहे. याशिवाय, इतर राज्यांमध्येही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी आतादेखील होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्यासंदर्भात दिल्ली विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी अरविंद केजरीवाल काय म्हणाले पाहा.

विधानसभेत संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची मागणी का केली जात आहे. तो यूट्यूबवर टाकावा. तुम्ही टॅक्स फ्री का करत आहात? अहो यूट्यूबवर टाका. तो फ्री होईल. तुम्हाला एवढी आवड असेल तर द कश्मीर फाईल्स यूट्यूबवर टाकायला विवेक अग्निहोत्रींना सांगा. चित्रपट फ्री होईल. सगळेच बघतील. टॅक्स फ्रीची काय गरज आहे?

  • या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला

केजरीवाल यांनी भाजप नेत्यांना 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे प्रमोशन बंद करण्यास सांगितले आहे. द काश्मीर फाईल्सशिवाय केजरीवाल यांनी बंटी और बबली या चित्रपटाचाही उल्लेख केला. द कश्मीर फाईल्सबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

चित्रपटाची कथा काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि विस्थापन यावर आधारित आहे. काश्मिरी पंडितांची दयनीय अवस्था या चित्रपटात दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे डोळे ओले होतात. भावनिक आणि राजकीय विषयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसोबतच राजकीय पातळीवरही लक्ष वेधून घेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news