कर्कश आवाज करणारी वाहने आवडणारे विक्षिप्तच..!जाणून घ्‍या नवीन संशोधन

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्कश आवाज करणारी दुचाकी 'धूम' स्‍टाईलने पळविणारी तरुणाई ही प्रत्‍येक शहरात दिसते.मागील काही वर्षांमध्‍ये फटाक्‍यांसारख्‍या आवाज काढणार्‍या दुचाकीमुळे रस्‍त्‍यावर जाणार्‍यांचा काहीकाळ थरकापही उडतो. गजबजलेल्‍या रस्‍त्‍यांवर सुसाट वेगाने दुचाकी किंवा कारच्‍या कर्णकर्कश आवाजाने सर्वांचे लक्ष वेधणे, असेही प्रकार आपण वारंवार पाहतो. मात्र अशा प्रकारचा आवाज त्‍या वाहनचालकाला का आवडत असेल? त्‍यांची मानिसकता नमेकी कशी असेल, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍यासाठी नुकतेच एक संशोधन झाले. जाणून घेवूया या संशोधनाविषयी…

ओंटारियोमधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर ज्युली एटकेन शेर्मर यांनी गोंगाट करणाऱ्या गाड्या आवडणाऱ्या लोकांचे मानसिक स्‍थिती शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्‍या पाळीव कुत्र्याला कॅम्पसजवळ फिरत असताना त्‍यांना या विषयावर संशोधन करण्‍याची कल्‍पना सुचली होती. त्‍याच्‍या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या लोकांना मोठ्या आवाजात गाड्या आवडतात. ते इतरांना त्रास देण्यात आनंद घेतात आणि विक्षिप्त असतात. ही आवड एक प्रकारचा मानसिक विकारच आहे.

प्रोफेसर ज्युली एटकेन शेर्मर यांनी केलेल्‍या सर्वेक्षणात ५२९ तरुणांनी भाग घेतला. त्यापैकी ५२ टक्के पुरुष होते. या लोकांना कार आणि दुचाकीच्या इंजिनचा मोठा आवाज आणि मफलर (इंजिनचा आवाज कमी करणारा भाग) बदलण्याची क्षमता यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी शॉर्ट डार्क टेट्राड (SD4) प्रश्नही विचारण्यात आले. त्यात इतरांना त्रास देण्‍याच्‍या मानसिकता असणार्‍या प्रश्नांचा समावेश होता. ज्या लोकांना आपल्या कारच्या इंजिनचे मफलर बदलायचे आहे, त्यांचा असा स्वभाव भविष्यात असू शकतो, असेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तसेच ज्या लोकांना मोठ्या आवाजात गाड्या आवडतात. ते इतरांना त्रास देण्यात आनंद घेतात आणि विक्षिप्त असतात. ही आवड एक प्रकारचा मानसिक विकारच आहे. मात्र या व्‍यापकता नसल्‍याने या संशाेधनातील निष्‍कर्षाला मर्यादा आहेत.

ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनावर चर्चा होत असताना. मोठ्या आवाजातील कारच्या पसंतीमागील हेतू समजून घेणे अधिक महत्त्‍वपूणं ठरेत. तसेच हे संशोधन वैयक्तिक मानसशास्त्र, सामाजिक नियम आणि ग्राहकांच्या निवडींना आकार देण्यासाठी तांत्रिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधही अधोरेखित करते, असेही संशोधकाने नमूद केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news