ड्रग्ज प्रकरणातील सिद्धांत एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही, जाणून घ्या त्याच्याविषयी

 siddhanth kapoor
siddhanth kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज खलनायक शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज सेवन प्रकरणात बंगळूर पोलिसांनी अटक केलीय. तुम्हाला माहितीये का, सिद्धांत कपूर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. तो एक अभिनेताही आहे. सिध्दांत कपूरने श्रध्दा कपूरसोबत हसीना परकर या चित्रपटात काम केलं आहे. त्यावेळी तो मोठ्या पडद्यावर झळकला होता. विशेष म्हणजे, तो उत्तम मराठीदेखील बोलतो. कारण, सिध्दांतची आई शिवांगी ही एकेकाळची मराठी अभिनेत्री होती.

एक हिरो म्हणून त्याची कारकिंर्द घडली नाही. फ्लॉप चित्रपटांची यादी त्याच्या नावावर आहे. त्याला त्याच्या सिनेकरिअरमध्ये कुठलाही हिट चित्रपट मिळाला नाही.  बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. सिद्धांत हा अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कपूरचा मुलगा आहे.

सिद्धांतने आपलं करिअर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरू केलं होते. यामध्ये भूलभुलैया, भागम भाग, चुप चुपके, ढोल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. २०१३ मध्ये क्राईम चित्रपट शूटआऊट ॲट वडलातून सिद्धांतने सिनेकरिअरला सुरूवात केली.

सिद्धांतने न्यूयॉर्कच्या Lee Strasberg Theatre and Film Institute मधून चित्रपट मेकिंग आणि अभिनयाचा कोर्स केला आहे. ॲक्टिंग लाईनमध्ये येण्याआधी सिद्धांतने DJ म्हणून आपलं करिअर सुरू केलं होतं. नंतर त्याने जवळपास दोन वर्ष दिग्दर्शक प्रियदर्शन सोबत सहाय्यक दिग्दर्शक काम केलं आहे.

आधी तो सोहम शाहचा चित्रपट सत्ते पे सत्ता मधून डेब्यू करणार होता. परंतु, हा चित्रपट होता होता राहिला. यानंतर सिद्धांतने २०१३ मध्ये चित्रपट शूटआऊट ॲट वडालातून डेब्यू केलं होतं. या चित्रपटामध्ये सिद्धांतसोबत अनिल कपूर, जॉन अब्राहम आणि कंगना रानौत दिसले होते.

सिद्धांतने हसीना पारकर, जज्बा, पल्टन, यारम, हॅलो चार्ली, दालन समान मुव्हीजमध्ये काम केले आहे. पण कोणत्याही चित्रपटामध्ये यश मिळाले नाही. बर्‍याच चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. आपल्या वडिलांप्रमाणे तो मोठा अभिनेता होऊ शकला नाही.

सिद्धांतने वेब सीरीज 'भौकाल'मध्ये देखील काम केले आहे. तो म्युझिक व्हिडिओ 'हम हिंदूस्तानी'मध्येही दिसला होता.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news