file photo
file photo

पिंपरी : गोरगरिबांच्या निवार्‍यासाठी लढा उभारणार : भोसले

Published on

पिंपरी : गोरगरीब व सर्वसामान्यांच्या निवारा, जमीन व घरांसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी बहुजन निवारा हक्क परिषद लढा उभारणार आहे, असे परिषदेचे अध्यक्ष गौतम भोसले यांनी सांगितले. महार वतन परिषद संचलित वंचित बहुजन निवारा हक्क परिषदेची बैठक नुकतीच पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.

बैठकीत अध्यक्ष प्रभू थोरात, महासचिव तुकाराम रणदिवे, उपाध्यक्ष सुधीर भालेकर, खजिनदार संजय चव्हाण, सचिन विशाल वाळके, सहसचिव देवीदास आरूप आदी उपस्थित होते.गौतम भोसले म्हणाले, की गोरगरीब, मागासवर्गीय व सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना न्याय मिळत नाही. त्यासाठी परिषद लढा उभारणार आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार आहे. गरज असल्यास न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news