धक्‍कादायक : मैदानी खेळ स्‍पर्धेवेळी भाला थेट विद्यार्थ्याच्या मानेत घुसला! ओडिशातील प्रकार

धक्‍कादायक : मैदानी खेळ स्‍पर्धेवेळी भाला थेट विद्यार्थ्याच्या मानेत घुसला! ओडिशातील प्रकार

पुढारी ऑनलाईन : शाळेतील वार्षिक क्रीडा स्‍पर्धेवेळी विद्यार्थ्याच्या  मानेत  थेट भाला घुसल्‍याचा धक्‍कादायक प्रकार ओडिशा राज्‍यातील बालंगीर जिल्ह्यात घडला. या दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. सदानंद मेहेर असे त्याचे नाव आहे. याच्‍यावर रुग्‍णालयात उपचार सुरु असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

सदानंद मेहेर हा नववीत शिकत आहे. बालंगीर येथील आगलपूर बॉय पंचायत हायस्कूलमध्ये मैदानावर क्रीडाप्रकार सुरू होते. दरम्यान दुसऱ्या एका मुलाने फेकलेला भाला हा जमिनीवर बसलेल्या सदानंदच्‍या मानेत घुसला. त्‍याच्‍यावर बलांगीर येथील भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेतील मुलावर चांगले उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाईल, अशी घोषणा केली आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत करण्याचे आदेश त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news