WhatsApp Voice Note Status : आता ‘व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर करता येणार ‘व्हॉईस नोट’

WhatsApp Voice Note Status : आता ‘व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर करता येणार ‘व्हॉईस नोट’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सोशल मीडियामध्ये आज सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे WhatsApp. त्‍यामुळे दिवसेंदिवस फेसबुकच्‍या मालकी असलेले WhatsApp वापरणाऱ्यांची संख्‍येत लक्षणीय वाढ होत आहे. आपल्या युझर्सना वापरण्यात सुलभता येण्यासाठी WhatsApp नवनवीन हटके आणि धमाकेदार फिचर आणतं असते. आता या ॲपने आणखी एक नवे फिचर युझर्ससाठी आणलं आहे. यामूळे युझरला व्हॉट्सॲप स्टेटसवरती व्हॉईस नोट (WhatsApp Voice Note Status) पाठवता येणार आहे. जाणून घ्या, हे नवीन फिचर केव्‍हा उपलब्ध  होणार आणि त्‍याच्‍या वापराविषयी…

WhatsApp  'स्टेटस'च्या माध्यमातून  युझर आपल्या भावना, महत्त्‍वाच्‍या घडामोडी किंवा  फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट शेअर करत असतात. आता या स्टेटस फिचरमध्ये आता व्हॉट्सॲपने नवे फिचर आणलं आहे. यामध्ये तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून तुमच्या भावना, माहिती किंवा काही अपडेट हे 'व्हॉईस नोट'च्‍या माध्‍यमातून शेअर करु शकता. सध्या हे नवं  फिचरचं व्हॉट्सॲपच्या निवडक  युजर्ससाठीच आहे. लवकरचं ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

असे असेल 'व्‍हाईस नोट'…

WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये WhatsApp स्टेटस व्हॉईस नोट (WhatsApp Voice Status Note) चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. युजर स्टेटसवर गेल्यानंतर रेकॉर्ड बटनवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर एखाद्‍याला किंवा समूहाला द्‍यावयाचा संदेश रेकॉर्ड केला जाईल. युजर ३० सेकंदापर्यंतचा व्‍हाईस नोट रेकॉर्ड करु शकतो.  त्यानंतर हा 'व्हॉईस नोट' स्टेटसला शेअर करता येतो. या माध्‍यमातून ओरल मेसेज ( मौखिक संदेश ) देण्‍याची सुविधा व्‍हॉटसॲपने युजरला उपलब्‍ध करुन दिली आहे. .

WhatsApp Voice Note Status :  २४ तास राहणार 'व्हॉईस नोट'

तुम्‍ही व्हॉट्सॲप स्टेटसवर फोटो, व्हिडीओ, लिखित संदेश शेअर केला तर तो सलग २४ तास राहतो. त्‍याचप्रमाणे व्हॉईस नोटही सलग २४ तास स्टेटसवरती राहणार आहे. तसेच तुम्‍ही कोणत्‍याही क्षणी तो डिलीटही करु शकता. हे फिचर सध्या बीटा यूजरसाठी उपलब्ध आहे. लवकरचं हे फिचर सर्व यूजर्सना उपलब्ध करणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरुन व्हॉट्सॲप अपडेट करणं गरजेचं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news