पुढारी ऑनलाईन : मेटा या पेरेंट कंपनीची मालकी असलेल्या 'व्हॉट्स ॲप' इंन्संट मेसेजिंग ॲपने मार्च महिन्यात जवळपास ४७ लाख खाती बंद केली आहेत, असे कंपनीने आपल्या मासिक अहवालातून (WhatsApp Accounts Ban) स्पष्ट केले आहे. कंपनीने मार्च २०२३ चा युजर्स सेफ्टी रिपोर्ट सादर केल्याचे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.
'व्हॉट्स ॲप'ने मार्च २०२३ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. परंतु, यापूर्वीच 'व्हॉट्स ॲप'ने १७ लाख सक्रिय खात्यांवर बंदी घातली होती. त्यानंतर ४७ लाख भारतीयांच्या 'व्हॉट्स ॲप'ने बंदी घातल्याचे मार्चमध्ये कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात देखील 'व्हॉट्स ॲप'ने काही खाती बंद केली होती. यामध्ये ४६ लाख युजर्सचा समावेश होता. +91 ने सुरूवात होणाऱ्या फोन नंबरद्वारे भारतीय खाते (WhatsApp Accounts Ban) ओळखले जाते, असे देखील एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
काही यूजर्सकडून तक्रार केल्यानंतर 'व्हॉट्स ॲप'ने ही कारवाई केली आहे. तसेच 'व्हॉट्स ॲप' या प्लॅटफटर्मवर होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी काही संसाधनांचा वापर देखील कंपनीकडून करण्यात येत असल्याचे 'व्हॉट्स ॲप'ने या अहवालात स्पष्ट केले आहे. कंपनी कोणतेही गंभीर नुकसान होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक (WhatsApp Accounts Ban) उपायायोजना करण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट केले आहे.