फुटबॉलचं वेड! आदी जर्सी घालून लग्न अन् नंतर जोडीने फिफा वर्ल्डकप फायनल…, या जोडीचा अनोखा अंदाज व्हायरल

FIFA World Cup 2022: काय हे वेडकाय हे वेड
FIFA World Cup 2022: काय हे वेडकाय हे वेड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात फुटबॉटलचीदेखील प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कतारमध्ये रविवारी (दि.१८) अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झाला. यात अर्जेंटिना विश्वविजेता ठरला. दरम्यान, भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये या सामन्यादरम्यान प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. अशीच एक अणोखी क्रेझ केरळमध्ये फुटबॉलप्रेमींमध्ये पाहायला मिळाली आहे. केरळमध्ये एका जोडप्याने सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या जर्सी घातली आणि हे दोघेही विवाहबंधनात अडकले. पुन्हा काही वेळानंतर फायनल सामना पाहण्यासाठी वराच्या घरी परतले.

अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन्ही संघात कतारच्या लुसेल स्टेडियममध्ये फुटबॉल विश्वचषकाचा सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमध्ये खच्च गर्दी होती. सामन्यादरम्यान जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत होती. दरम्यान केरळमधील सचिन आर आणि आर अथिरा या जोडप्यांनी फायनल सामन्या दरम्यानचा मुहूर्त शोधला आणि ते विवाहबंधनात अडकले. यामध्ये वधूने फ्रान्सच्या संघाची जर्सी घातली होती तर, वराने मेस्सीच्या अर्जेंटिना संघाची जर्सी घालून विवाह केला. यानंतर या दोघांनीही एकत्र बसून हा सामना बघितला.

वर सचिन अर्जेंटिना स्टार लिओनेल मेस्सीचा निस्सीम चाहता आहे, तर वधू अथिरा फ्रेंच फुटबॉल संघाची समर्थक आहे. या दोघांनीही वधू-वराचा पारंपारिक पोशाख घातला होता. याचबरोबर पोशाखावर या जोडप्यांमधील अथिरा हिने फ्रान्स फॉरवर्ड किलियन एम्बप्पाचे जर्सी घातली होती, तर सचिन याने मेस्सीसाठी अर्जेंटिनाची १० नंबरची जर्सी घातली होती. असे वृत्त मल्ल्याळम मनोरमा या वृत्तपत्राने दिले आहे.

लग्न समारंभ आणि रिसेप्शन दरम्यान या दोघांनीही २०६ किलोमीटर इतकी धावपळ करत, फुटबॉलच्या वेडापायी घरी येऊन जोडीने फुटबॉल वर्ल्डदेखील पाहिला. त्यांच्या या वेडापायी समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news