पुढारी ऑनलाईन डेस्क : (SPG सुरक्षा) काल ५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा नियोजित होता. या दौऱ्यात सुरक्षेसंदर्भात चुक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुरक्षेतमोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली. आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावरच अडकले होते.
नरेंद्र मोदी भटिंडा विमानतळावर गेल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया दिली आहे. "तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो". असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. यामुळे या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहेत. भाजप नेत्यांनी यावर पंजाब मधील काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान हेलिकॉप्टरने येणार होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा मार्ग बदलण्यात आला आणि ते रस्त्याने आले. अस त्यांनी म्हटलं आहे. खरतर देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असते. त्याचे नियोजन केण करत असते. त्यांची सुरक्षे कशी असते हे आपण जाणून घेऊया.
कोणत्याही महत्वपूर्ण व्यक्तीला सुरक्षा देणे हे काम सरकारचे असते. केंद्रीय गृहमंत्रालय आपल्या सुरक्षा एजन्सीमार्फत या लोकांच्यावर असणाऱ्या संकटाचा अंदाज लावत असते. व्हीआयपी लोकांना धोका अनेक बाजूंनी असू शकतो. आतंकवादी, आरोपींपासून काहीवेळा राजकाणातूनही असू शकतो. एखाद्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असे जेव्हा सरकारला वाटते, तेव्हा त्या धोक्याचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची आणि किती ताकद लागते हे सरकार पाहत असते. आणि त्या पध्दतीची सुरक्षा फोर्स सरकार देत असते.
देशातील व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. पंतप्रधान यांना सुरक्षा देणारी एजन्सी ही फक्त पंतप्रधानांना सुरक्षा देते. SPG ही (SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) एजन्सी पंतप्रधान यांची सुरक्षा पाहत असते.
भारतात VVIP सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक एजन्सी आहेत. यात जास्त SPG ही एजन्सी प्रसिध्द आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPG ची स्थापना १९८५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झाली होती. आता देशात एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांना ही सुरक्षा एजन्सी सुरक्षा देत आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन बिल २०१९ पास होण्याअगोदर SPG भारताचे पंतप्रधान आणि त्यांच्या परिवाराला आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा पुरवण्याचे काम करत होते. १९८८ मध्ये यासंबंधित बील संसदेत पास झाले होते. त्यावेळी माजी पंतप्रधानांना कायद्यात या संरक्षणासाठी पात्र मानले जात नव्हते. याच आधारावर व्हीपी सिंग सरकारने १९८९ मध्ये राजीव गांधींची SPG सुरक्षा काढून घेतली.
राजीव यांची १९९१ मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर SPG कायद्यात सुधारणा करण्यात आली. सर्व माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना किमान १० वर्षांसाठी SPG संरक्षण मिळेल, असे नमूद करण्यात आले होते. २००३ मध्ये या कायद्यात पुन्हा सुधारणा करण्यात आली. यानुसार माजी पंतप्रधानांना पद सोडल्यानंतर केवळ एक वर्षासाठी SPG सुरक्षा मिळाले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या SPG कमांडोंनी औपचारिक काळा सूट, काळा चष्मा घातलेला असतो. ते त्यांच्यासोबत एनक्रिप्टेड कम्युनिकेशन इअरपीस घालतात. विशेष प्रसंगी सफारी सूट घालतात. SPG कडे अल्ट्रा-मॉडर्न असॉल्ट रायफल असलेले स्पेशल ऑपरेशन कमांडो देखील आहेत. अंगभूत कम्युनिकेशन इअरपीस, बुलेटप्रूफ व्हेस्ट, हातमोजे आणि कोपरा तसेच गुडघ्याला पॅड घालतात.
SPG पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना करते. पंतप्रधान देशाच्या दौऱ्यावर असोत किंवा परदेशात. पंतप्रधानांना भेटणाऱ्या लोकांची संख्या, कार्याची माहिती, पंतप्रधानांच्या फोन कॉलला उत्तरे देणे, त्यांचे वेळापत्रक तयार करणे. त्यांच्यासाठी गाड्या निश्चित करणे. हे सर्व SPG चे काम आहे.
SPG पंतप्रधानांच्या भोवती सुरक्षा कवच बनवून त्यांचे संरक्षण करते. कोणत्याही हल्ल्यात पंतप्रधानांना संरक्षण देणे आणि तेथून बाहेर काढणे हे या सुरक्षा वर्तुळात राहणाऱ्या सदस्यांचे काम आहे. SPG काउंटर अॅसॉल्ट टीम सहसा दुसऱ्या वर्तुळाचा समावेश करते. त्यांचे काम पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कव्हरिंग फायर पॉवर प्रदान करणे आहे. तिसऱ्या सर्कलमध्ये SPG व्यतिरिक्त NSG आणि इतर जवानांचा सहभाग असतो. तर शेवटच्या सर्कलमध्ये स्थानिक पोलिस दला सोबत SPG चे जवानही असतात. ते गर्दी हाताळण्याचेही काम करतात.
हेही वाचलत का?