

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना रुग्णांची होत असलेली वेगाने वाढ आणि तिसर्या लाटेच्या शक्यतेने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंशतः कोरोनाची लक्षणे असल्यास अथवा कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी गृह विलगीकरणासाठीची नवीन नियमावली बुधवारी जारी केली. (Home Isolation Rule)
रुग्ण कमीत कमी 7 दिवसांत पॉझिटिव्ह आढळला नाही तर आणि सलग तीन दिवस ताप नसल्यास रुग्णाचे गृह विलगीकरण संपविण्यात येईल, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाने आपल्या खासगी वस्तू कोणालाही वापरण्यास देऊ नयेत. तसेच ऑक्सिजनचे प्रमाण आणि नियमितपणे शरीराच्या तापमानाची तपासणी करावी.
तसेच नियमित तीन स्तरांचा मास्क घालून 72 तासांनंतर त्याची विल्हेवाट लावावी, नियमितपणे हात धुण्यासह शरीरातील पाणी कमी होऊ नये, याकडे लक्ष्य देण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत.
वृद्ध कोरोनाबाधिताला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी
कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच राहावे, त्यांच्यासाठी खुली जागा द्यावी
रुग्णाने नियमितपणे हलका आहार घ्यावा एचआयव्हीबाधित, कॅन्सरग्रस्त रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणात ठेवले जाईल.
मास्कसह सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक मास्कचा वापर कमी केलेल्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आहे.
याउलट ज्या देशांनी लॉकडाऊन केला नाही, त्यांची परिस्थिती सर्वश्रूत आहे. परिणामी, वैयक्तिक पातळीवर मास्क लावल्यास नक्कीच लाट थोपवता येईल.
अन्यथा लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तसे झाले तर पुन्हा कोट्यवधी लोक रोजगाराला मुकतील. सध्याची वाढणारी रुग्णसंख्या पाहता लवकरच दाखल रुग्ण व ऑक्सिजनची मागणी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
ओमायक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे.
मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे.
राज्यात जवळपास 85 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. तर, 60 टक्क्यांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
पहिल्या दोन लाटा व राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.
विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रतिकारकशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमायक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.