थकवा जाणवतोय, काय आहे ‘क्रॉनिक फटिग सिंड्रोम’?

आजार दीर्घकालीन थकव्याचा
आजार दीर्घकालीन थकव्याचा

भरपूर झोप झाली की थकवा पळून जातो. परंतु, प्रदीर्घ काळापासून थकव्याने त्रस्त असलेल्यांना नीट झोपही लागत नाही आणि व्यवस्थित आरामही मिळत नाही. 30 ते 45 वयोगटातील कामकरी नागरिकांमध्ये थकव्याची समस्या वेगाने वाढत असल्याचे दिसते.

तुम्ही काय खाता, काय करता, कसा विचार करता यावर थकव्याच्या समस्येची तीव्रता अवलंबून असते. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ थकवा जाणवल्यास दुर्लक्ष न करता जीवनशैली बदलण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करा.

संबधित बातम्या 

सातत्याने जाणवणारी सुस्ती किंवा थकवा जीवनातील अनेक सुखे हिरावून घेतो. या काळात कोणत्याही गोष्टीची पर्वा करावीशी वाटत नाही. काम करण्याच्या क्षमतेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. शारीरिक थकवा मानसिकदृष्ट्याही माणसाला थकवून टाकतो. काही नवे करण्याची प्रेरणाच गायब होते.

'क्रॉनिक फटिग सिंड्रोम'

प्रदीर्घकाळ टिकणार्‍या थकव्याच्या समस्येला 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' (सीएफएस) असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत हा आजार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, यूएस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने गेल्या वर्षी या आजाराला 'सिस्टिमॅटिक एŠझर्शन इन्टॉलरेन्स डिसीज' असे नाव दिले. एखाद्या व्यक्तीमध्ये 'सीएफएस'ची लक्षणे दिसतात की नाही, याचे निदान 'एŠसŠल्यूजन डायग्नोसिस' प्रणालीद्वारे केले जाते. म्हणजेच, थकव्याची जी काही संभाव्य कारणे असू शकतात, त्याचा एका पाठोपाठ एक आढावा घेतला जातो. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वेगवेगळी कारणे असू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती डळमळीत होते,

एखाद्या आजाराच्या जंतूंचा संसर्ग होतो किंवा चयापचय क्रियेत अडथळे उत्पन्न होतात तेव्हा व्यक्ती 'सीएफएस'ने ग्रस्त होऊ शकते. वारंवार डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, स्नायू कमजोर होणे, सतत मूड बदलणे, झोप उडणे ही 'सीएफएस'ची लक्षणे आहेत. 2015 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, ज्यांना दीर्घकालीन थकव्याचा आजार जडतो, त्यांना दृष्टीसंबंधीच्या तक्रारी अधिक जाणवतात आणि वाचताना त्रास होतो.

हे लक्षण इतके सार्वत्रिक आहे की, 'सीएफएस'चे निदान करण्याची ही पहिली पायरी ठरावी. 'सीएफएस' बरा होण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. वारंवार झोप येणे, डुलŠया काढणे, पडल्या-पडल्या घोरू लागणे अशा समस्या अनेकजणांना जाणवतात; परंतु ही थकव्याचीच लक्षणे असतील असे नाही. दीर्घकालीन थकव्याच्या समस्येत शरीर आणि मनःस्वास्थ्याशी निगडित अनेक गंभीर कारणे असू शकतात. भरपूर झोप घेऊनसुद्धा थकव्याची समस्या दोन आठवड्यांहून अधिक काळ मुक्काम ठोकत असेल, तर तातडीने डॉŠटरांकडे जायला हवे.

…अशी असू शकतात कारणे

दीर्घकालीन थकवा जाणवत असेल तर थायरॉईड ग्रंथीमध्ये झालेले असंतुलन त्याला कारणीभूत असू शकते. हे लक्षण प्रायः महिलांमध्ये दिसून आले आहे. त्वचा आणि केस जर प्रमाणापेक्षा अधिक रुक्ष वाटत असतील आणि इतरांपेक्षा थंडी अधिक प्रमाणात वाजत असेल तर थायरॉईड ग्रंथीची तपासणी करून घेणे श्रेयस्कर ठरते. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, हेही दीर्घकालीन थकव्याचे एक कारण असू शकते. अनेकजणांना हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची तपासणी करणे आवश्यक वाटत नाही. रक्तात ऑिŠसजनचे संतुलन ठेवणार्‍या हिमोग्लोबिनची कमतरता लोहाच्या कमतरतेमुळे जाणवू शकते. ही समस्याही महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

लोहयुक्तपदार्थांचे सेवन हाच त्यावरील योग्य उपाय होय. शरीरात पोषणमूल्यांची कमतरताही थकव्याला जन्म देऊ शकते. 'स्लिम अँड ट्रिम' होण्याच्या शर्यतीत वेगवेगळे 'डाएट प्लॅन' कोणाच्याही सल्ल्याविना अंमलात आणले जातात. त्यामुळे शरीरात पोषकद्रव्यांची कमतरता जाणवू लागते. बी-12, बी-2, बी-6, ई या जीवनसत्त्वांव्यतिरिक्त मॅग्नेशियम, झिंक अशा खनिजांची कमतरता यामुळे उत्पन्न होते आणि थकवा जाणवू लागतो. पचनक्रियेसाठी मॅग्नेशियम गरजेचे असते. मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी केळे, मासे, सुका मेवा, सोयाबीन किंवा डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करावा.

रात्रीच्या वेळी वारंवार झोपमोड होणे (स्लीप एप्निया) किंवा एखाद्या खाद्यपदार्थाच्या अ‍ॅलर्जीमुळेही थकव्याची समस्या मूळ धरू शकते. या प्रकारचा थकवा दीर्घकालीन ठरू शकतो. आळसाने भरलेली आणि एकसुरी जीवनशैलीही थकव्याचे एक मोठे कारण असू शकते.

योग्य आहार, व्यायामाने फायदा

थकव्याची समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी आरोग्यवर्धक आहार घेतला पाहिजे, तसेच तीन-चार तासांच्या अंतराने स्नॅŠस घेतले पाहिजेत. एकाच वेळी भरपूर खाणे मात्र टाळावे. तळलेल्या पदार्थातून अतिरिक्त ऊर्जा शरीरात निर्माण होत असल्याने असे पदार्थ टाळले पाहिजेत. डाएटिंग करणारे नेहमी कार्बोहायड्रेट

असलेले पदार्थ टाळतात; परंतु असे पदार्थ एक चांगला ऊर्जास्रोत असतात. असे पदार्थ संतुलित प्रमाणात खाल्ले जातील, याची खबरदारी घेतली पाहिजे. न्याहारी प्रथिनांनी परिपूर्ण असावी. मिठाचे प्रमाण कमी असावे. भूक लागेल तेव्हाच खावे. भूक लागल्यावर चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे थकवा जाणवू लागतो. त्यामुळे अधूनमधून काही ना काही खात राहावे. थकवा टाळण्यासाठी व्यायाम जरूर करावा. हलक्या व्यायामाने सुरुवात केली तरी चालेल; मात्र काही दिवस तो नियमित करायला हवा. हळूहळू त्याचे परिणाम दिसून येऊ लागतील.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news