कॅलिफोर्निया : माझे डोके फारच गरम झाले आहे, माझ्याशी बोलू नको, असे सांगताना तुम्ही अनेकांना पाहिले असणार. खरोखरच आपला मेेंदू गरम होतो का? असे होत असल्यास आपल्या मेेंदूचे तापमान (Human brain temperature) उर्वरित शरीराच्या तुलनेत वाढते की घटते? याचा कधी विचार केला आहे का?
मेेंदूच्या तापमानासंदर्भात नुकतेच एक नवे संशोधन समोर आले आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार दिवसभरात आपल्या मेंदूचे तापमान अनेकवेळा घटते आणि वाढतेही. ब्रिटनमधील जर्नल ब्रेन या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार आपल्या शरीराचे सामान्य तापमान 98 अंश फॅरेनाईट (37 अंश सेल्सिअस) इतके असते. यामुळे बहुतेक लोकांना मेेंदूचेही तापमान (Human brain temperature) इतकेच असावे, असे वाटते.
पण संशोधनातील माहितीनुसार तंदुरुस्त मेेंदूचे तापमान शरीराच्या उर्वरित भागापेक्षा जास्त असते. मेेंदूचे सरासरी सामान्य तापमान 38 अंश सेल्सिअस (Human brain temperature) इतके असते. जे उर्वरित शरीराच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअसने जास्त असते. ब्रिटनच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपल्या मेेंदूच्या खोल भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस इतके असते. मात्र, उर्वरित शरीराचे तापमान इतके झाल्यास डॉक्टर तापावरील उपचारास सुरुवात करतात.
मेेंदूचे तापमान (Human brain temperature) किती असते, याची चाचपणी करण्यासाठी केलेल्या या संशोधनात 20 ते 40 वयोगटातील तंदुरुस्त 40 स्वयंसेवकांना सहभागी करवून घेण्यात आले होते.