Devendra Fadnavis : आम्ही खाते वाटप करू, तुम्ही पतंग उडवत रहा; फडणवीसांचा विरोधकांना टोला

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या मंत्रीमंडळ झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे- फडणवीस सरकारवर खातेवाटपावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही खाते वाटप करू, तुम्ही पंतंग उडवत रहा असा टोला विरोधकांना लगावला आहे. भाजपचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, चद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ओबीसीच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने काम केले आहे. बावनकुळे हे ओबीसींचा नवा चेहरा आहेत. पक्षाचा कट्टर सैनिक आज अध्यक्ष झाला याचा मला मनापासून आनंद असल्याचे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news