पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता दिल्लीत विकेंड कर्फ्यू (Weekend curfew ) (संचारबंदी) लावण्याचा निर्णय आज घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी १० ते सोमवारीपहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. तसेच या काळात सर्व सरकारी कर्मचार्यांना घरातूनच कामकाज करावे लागेल.
दिल्ली आपत्तकालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत विकेंड कर्फ्यू (Weekend curfew ) लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लागू केली होती. आता कोरोना संसर्ग दर हा ५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने विकेंड कर्फ्यू निर्णय घेण्यात आल्याचे आला आहे. आता संसर्ग दर हा पुढील दोन दिवस पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यास रेड अलर्ट लागू केला जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आज नायब राज्यपालांनी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या
अधिकार्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित रहाणार होते. मात्र या बैठकीपूर्वीच त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते घरातच विलगीकरणात राहत आहेत.
दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज रुग्णसंख्या अशीच वाढत गेली तर १५ जानेवारीपर्यंत ती २५ हजारांपर्यंत पोहचेल, अशी भीतीही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. 'एम्स'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितहॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्या वाढतली आहे. मागील तीन दिवसांमध्ये ५० हून अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत सोमवारी ( दि. ३) ४,०९९ नवे रुग्ण आढळले होते. रविवारच्या तुलनेत रुग्णवाढीच्या संख्येत तब्बल २८ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे.
हेही वाचलं का?