रुग्‍णसंख्‍या २० हजारांवर गेल्‍यास मुंबईत पुन्‍हा लॉकडाउन : महापाैर पेडणेकर | पुढारी

रुग्‍णसंख्‍या २० हजारांवर गेल्‍यास मुंबईत पुन्‍हा लॉकडाउन : महापाैर पेडणेकर

मुंबई, पुढारी ऑनलाईन :  मुंबईतील कोरोना स्थितीवर महापालिका आयुक्त स्वत: लक्ष ठेवून आहेत. काेराेना रुग्‍णसंख्‍या २० हजारांपेक्षा अधिक झाल्‍यास केंद्र सरकारच्‍या नियमानुसार लॉकडाउन लावाला लागेल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज स्‍पष्‍ट केले.

मुंबईत कोरोना आणि ओमिक्रोनच्या रूग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात एका वृत्त वाहिनीशी बाेलताना सांगितले की, मुंबईतील नागरिकांनी कोणताही सोहळा कोराना नियमात राहून करावा, गर्दीत जाणे कंटाक्षाने टाळा, कोरोनाची वाढती संख्या चिंता वाढवणारी  आहे.

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येने २० हजारांचा आकडा पार झाला केला तर केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन करावा लागेल. याआधीही किशोरी पेडणेकर यांनी कोरोना नियंमाचे पालन काटेकोर करण्याचे आवाहन नागरिकांनी केलं होतं. यात त्यांनी गर्दीत जाणे टाळावे. नेहमी मास्क वापरावे, सॉनिटायझर वापराले असे सांगितले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button