mugdha and shruti seth
mugdha and shruti seth

Bloody Brothers : श्रुती सेठ-मुग्धा गोडसेच्या बोल्ड किसिंगची चर्चा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रुती सेठ टीव्हीची प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने ओटीटीच्य विश्वात पाऊल ठेवलं आहे. श्रुती लवकरच वेब सीरीज 'ब्लडी ब्रदर्स'मध्ये (Bloody Brothers) दिसणार आहे. या सीरीजमध्ये श्रुतीसोबत मुग्धा गोडसेदेखील दिसणार आहे. श्रुती-मुग्धाची ही (Bloody Brothers) वेब सीरीज लवकरच जी-५ वर स्ट्रीम होईल. ही सीरीज येण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण आहे सीरीजमध्ये श्रुती आणि मुग्धा यांचं किसिंग सीन! या सीरीजमध्ये मुग्धा आणि श्रुतीने एक किसिंग सीन केलं आहे. आता श्रुतीने किसिंग सीन विषयी एक मोठे विधान केलं आहे.

श्रुतीने एका मुलाखतीत सांगितलं आहे, ज्या ती आपली वेब सीरीज 'ब्लडी ब्रदर्स' विषयी उघडपणे बोलताना दिसते. तिने आपल्या आणि मुग्धाच्या किसिंग सीनवर आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, तिला हा सीन मजेदार वाटला होता.

ती म्हणाली की, 'हा सीन आमच्यासाठी खूप मजेदार वाटला होता. कारण, आम्ही दोघींनी आधी कधीच अशा प्रकारे सीन कधीचं केला नव्हता. परंतु, आमचे दिग्दर्शक शाद अलीने आम्हाला ही गोष्ट सहजसोपी करून दिली. आम्ही प्रयत्न केला की, ते नैसर्गिक वाटावं आणि तो सीन शूट करण्यात आला.

या मुलाखतीत श्रुती सेठला किसिंग सीनवर ऑडियन्सच्या रिॲक्शनविषयी विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, ऑडियन्सच्या प्रतिक्रियेसाठी आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. श्रुती सध्या आपल्या या वेब सीरीजचं प्रमोशन करत आहे. या सीरीजचे साह भग असतील. या सीरीजमध्ये जीशान अयूब, सतीश कौशिक, टीना देसाई यांच्याही भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Seth (@shru2kill)

logo
Pudhari News
pudhari.news