Aamir Khan : कधी कॉलेज कुमार तर कधी बाप; हे सर्व शक्य तरी कसं? | पुढारी

Aamir Khan : कधी कॉलेज कुमार तर कधी बाप; हे सर्व शक्य तरी कसं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

कधी कॉलेज कुमार तर कधी चार मुलांचा बाप अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या आमिर खानचा (Aamir Khan) आज १४ मार्च रोजी वाढदिवस आहे. आमिर खानन आतापर्यंत ज्या -ज्या भूमिका केल्या, त्या भूमिकांमध्ये तो पऱफेक्ट बसला आहे. बॉलिवूडमध्ये हा (Aamir Khan) एकमेव अभिनेता आहे, जो वास्तवात कुठलीही भूमिका अगदी सहजपणे साकारू शकतो, असे म्हणायला हरकत नाही. मग, तो ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील कॉलेज तरुण असेल किंवा ‘दंगल’मधील चार मुलांचा बाप! जाणून घेऊया मिस्टर परफेक्टनिस्टचा आजवरपर्यंतचा प्रवास!

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अभिनयाच्या दुनियेत एक वेगळं नाव कमावलं आहे. आमिरचा जन्म १४ मार्च, १९६५ रोजी मुंबईत झाला. आमिरचे वडील ताहिर हुसैन चित्रपट निर्माते होते. त्याचे काका नासिर हुसैन निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्याचा भाचा इमरान खानदेखील हिंदी चित्रपट इंडस्‍ट्रीमध्ये अभिनेता आहे. आमिरने सुरुवातीचे शिक्षण जे. बी. पेटिट स्कूलमधून पूर्ण केले. १२ वी चे शिक्षण नारसी मूंजी कॉलेजमधून पूर्ण केले. चित्रपट बॅकग्राउंड असल्याने आमिरने हिंदी सिनेमामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं.

त्याने आपल्या करिअरची सुरूवात त्याने ‘कयामत से कयामत तक’ (१९८८) या चित्रपटातून केली. हा चित्रपट त्याच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातून आमिर रातोरात स्टार झाला होता. पुढे दिल है कि मानता नहीं, जो जीता वही सिकंदर, अंदाज अपना अपना, रंगीला, राजा हिंदुस्तानी, गुलाम, सरफरोश, लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती, फना, तारे जमीं पर, गजनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके, दंगल य़ासारखे चित्रपट केले.

आमिरला त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. आमिरला २००३ मध्ये पद्मश्री, २०१० मध्ये पद्म भूषण पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आलं. २०१३ मध्ये मौलाना आजाद राष्‍ट्रीय उर्दू विद्यापीठाने त्याला डॉक्‍टरेटची उपाधी दिली.

गरजेनुसार स्वत:त बदल करणं जमतं तरी कसं?

चित्रपटाची जशी गरज आहे, त्याप्रमाणे आपल्या शरीरयष्टी आणि व्यक्तीमत्त्वात बदल करणं सोपं नाही. पण, हे शक्य झालंय ते आमिर खानला. त्याने केलेली प्रचंड मेहनत हेच त्याचं यश आहे. दंगल चित्रपट तर सर्वश्रुत आहे. तुम्हाला माहितीये की, या चित्रपटात आमिर तीन मलांच्या वडिलांच्या भूमिकेत होता. आपण तीन मुलांचा बाप दिसावं म्हणून आमिरने आपले वजन कितीतरी पटीने वाढवले होते. पण, जेव्हा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, तेव्हा त्याने पूर्ववत आपली शरीरयष्टी कमावली. फिट टू फॅट आणि फॅट टू फिटचं गणित केवळ आमिरचं सोडवू शकतो.

वडा पाव, समोसे खाऊन वाढवलं वजन

दंगल चित्रपटात त्याने महावीर सिंह ही भूमिका साकारली होती. यासाठी त्याला आपले वजन ९७ किलोपर्यंत न्यायचे होते. जाडजूड दिसण्यासाठी वडा पाव, पाव भाजी, समोसे सगळं काही खाऊन आमिरने आपले वजन वाढवले होते. खाऊन खाऊन वजन वाढेल हो, पण, वाढलेलं वजन कमी कसं करणार?.

आमिर स्वत:ला असं ठेवतो फिट

आमिरच्या दिवसाची सुरुवात सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होते. तो अनेक तास फिजिकल ॲक्टिविटी करतो. आपलं वजन कमी करण्यासाठी तो घाम गाळतो. आमिर खानच्या आहारात फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीनची मात्रा असते. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारचा आहार, लिंबू पाणी, बीट खातो. दिवसभरात तो थोडं थोडं खातो. ड्राय फ्रूट्स, नट्स, प्रोटीन शेकदेखील घेतो. सफरचंद , केळ अशी फळेदेखील त्याला आवडतात. दूध, ब्राउन ब्रेड, ऑम्लेट, बिर्याणीदेखील त्याला आवडते.

सोबतचं कॅलरी काऊंटदेखील तो सातत्याने करतो. तो डेली रु‍टीनमध्ये सायकिलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग आणि टेनिस खेळतो. सोबतचं सकाळी कार्डियो, दुपारी वेट ट्रेनिंग आणि सायंकाळी कार्डियोदेखील करतो. तासनतास घाम गाळल्यानंतर वजन तर कमी होणारचं. इच्छित शरीरयष्टी आणि व्यक्तीमत्व ठेवायला, आमिर खानचं ‘परफेक्ट’ आहे!

आमिरचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा खूप चर्चेत आहे. फॅन्सना या चित्रपटाची खूप उत्सुकता लागून राहिलीय. आमिरसोबत या चित्रपटात करीना कपूर खानदेखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

Back to top button