Weather warning: पुढचे काही दिवस विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना भरणार हुडहुडी

Weather warning: पुढचे काही दिवस विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना भरणार हुडहुडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: पूर्व मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील विदर्भाला पुन्हा हुडहुडी भरणार (Weather warning) असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. विदर्भातील नागपूर आणि गोदिंया या दोन जिल्ह्यांत शुक्रवारी (दि.०४) थंड लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी घसरणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागत पुन्हा थंडी वाढली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आज ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमान,पुण्यात १०. ३ अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये ९.४ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे. राज्यात अनेक भागात किमान तापमानात घट झाल्याने पुन्हा थंडी वाढली (Weather warning) असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news