साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणदरम्यान विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी | पुढारी

साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणदरम्यान विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी

वर्धा; पुढारी वृत्तसेवा: वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. दरम्यान या साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणदरम्यान विदर्भवादी दोन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत, जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वारंवार निदर्शने, बॅनरसह घोषणाबाजी करीत लक्ष वेधले. कडक सुरक्षा व्यवस्थेत कागद फाडून भिरकावणे, महिलांची बॅनर हाती घेत घोषणाबाजीने पोलिसांचीही तारांबळ उडाली.

मी कुणाचा अवमान करीत नाही. मात्र, चर्चेची दारे सर्वांसाठी खुली आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र,चारपाच वेळा हा प्रकार घडल्याने मंडपात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विदर्भवाद्यांनी विदर्भावर ऊर्जा, पाणी, निधी अशा प्रत्येक गोष्टीत अन्याय होत असल्याचा आरोप केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरुच होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे सरकार असून आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे चोवीस तास उघडी आहेत.

दरम्यान, साहित्य संमेलनाच्या सभामंडपाबाहेर देखील काही महिलांनी देखील घोषणाबाजी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आंदोलनकर्त्या महिला आम्हाला बोलू द्या, कुणीतरी आमचे ऐका, आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जा, पण विदर्भ वेगळा करुन द्या, अशी मागणी करीत होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून या महिलांना वेळीच दूर नेले.

Back to top button