Weather Update : विदर्भातील ‘या जिल्ह्यांना’ आजपासून ५ दिवस अलर्ट

Weather Update : विदर्भातील ‘या जिल्ह्यांना’ आजपासून ५ दिवस अलर्ट
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहा:कार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरने विदर्भातील पुढील पाच दिवसांसाठी पावसाची काय स्थिती असणार आहे याबबत माहिती दिली आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे. (Weather Update)
संबधित बातम्या
Weather Update
Weather Update

Weather Update : नागपूरला आज ऑरेंज अलर्ट

पावसाने नागपूरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरने विदर्भातील पुढील पाच दिवसांसाठी पावसाची काय स्थिती असणार आहे याबबत माहिती दिली आहे. आज शनिवारी (दि.२३) नागपूरमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे तर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. नागपूर,अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना उद्या रविवारी (दि. २४) प्रादेशिक हवामान विभागाने  'यलो अलर्ट' जारी केला आहे.

या दोन दिवशी विदर्भाला 'यलो अलर्ट'

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबरला 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना २७ सप्टेंबरला देखील 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे.

Nagpur Flood : ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहाकार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्‍याने मदत कार्याला वेग आला आहे. नागपूरमध्‍ये 'एसडीआरएफ'च्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने ३४९ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news