विरोधकांच्या INDIA आघाडीला मोठा धक्का! ममता बॅनर्जींचा लोकसभेसाठी ‘एकला चलो रे’चा नारा

विरोधकांच्या INDIA आघाडीला मोठा धक्का! ममता बॅनर्जींचा लोकसभेसाठी ‘एकला चलो रे’चा नारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. तृणमूल काँग्रेस लोकसभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममतांच्या या भूमिकेने विरोधी इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

"काँग्रेस पक्षाशी माझी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मी वारंवार म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आमचा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपला हरवू. मी INDIA आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही…" असे ममतांनी म्हटले आहे.

काँग्रेसने ३०० जागांवर निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भागात भाजप विरुद्ध लढण्यासाठी मोकळीक द्यावी, असे आम्ही आधीच सांगितले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील, पण त्यांनी हस्तक्षेप केल्यास पुन्हा विचार करावा लागेल, असेही त्यांनी संकेत दिले आहेत.

ममतांनी INDIA आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने करण्यावरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तृणमूलने काँग्रेसला दोन जागा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने ४२ पैकी केवळ दोन जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

तेव्हा आम्ही दोन जागा जिंकल्या होत्या आणि आताही त्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केला होता. आम्हाला तृणमूलकडून कोणत्याही भिकेची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एका व्यासपीठावर एकत्र आले होते. विरोधकांनी एकजूट दाखवून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्याची रणनिती आखली होती, पण आता बंगालमध्ये ममतांनी विरोधकांच्या INDIA आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news