एक ‘चेंडू’ आणि तब्‍बल १८ धावा! TNPL T20 सामन्‍यात नेमकं काय घडलं? ( Video)

तामिळनाडू प्रीमियर लीग ( TNPL) T20 सामन्‍यात सालेम स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तन्वर याने शेवटच्‍या षटकाच्‍या अखेरच्‍या चेंडूवर तब्‍बल १८ धावा दिल्‍या.
तामिळनाडू प्रीमियर लीग ( TNPL) T20 सामन्‍यात सालेम स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तन्वर याने शेवटच्‍या षटकाच्‍या अखेरच्‍या चेंडूवर तब्‍बल १८ धावा दिल्‍या.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटमधील एका चेंडूत तब्‍बल १८ धावा कशा करता येतील, असा प्रश्‍न तुम्‍हाला पडला असेल.  मात्र हे तामिळनाडू प्रीमियर लीग ( TNPL) T20 सामन्‍यात घडलं आहे.  क्रिकेटला 'गेम ऑफ चान्स' असे का म्‍हटलं जातं. याचा प्रत्‍यय या सामन्‍यात क्रिकेट प्रेमींना आला. गोलंदाजाला एका चेंडूसाठी तब्‍बल १८ धावा मोजाव्‍या लागल्‍या. ( Most Expensive Ball in Cricket )

तामिळनाडू प्रीमियर लीग 2023 T20 सामन्‍यात १ चेंडूत १८ धावा झाल्या.  सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज हे संघ आमने-सामने होते. चेपॉक सुपर गिलीजच्या खेळीदरम्यान, कर्णधार अभिषेक तन्वर स्वत: सालेम स्पार्टन्सकडून शेवटचे षटक टाकण्‍यासाठी आला. मात्र याची मोठी किंमत संघाला मोजावी लागली.

२०व्‍या षटकाच्‍या शेवटच्या चेंडूवर 18 धावा लुटल्या

अभिषेकने पहिला चेंडू टाकला तेव्हा उथिरासामी शशिदेव स्ट्राईकवर होता. पहिल्या चेंडूवर शशिदेवने धाव घेतली. त्यानंतर संजय यादव याने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव होऊ शकली नाही. चौथ्या चेंडूवर संजयने १ धाव घेतली. पाचवा चेंडू नो बॉल होता. त्यानंतर अभिषेकच्या पुढच्या चेंडूवर शशिदेवने पळत जाऊन सिंगल घेतली. आता शेवटचा चेंडू बाकी होता आणि संजय यादव स्ट्राईकवर होता.

Most Expensive Ball in Cricket : शेवटच्या चेंडूवर १८ धावा

19.6 – शेवटचा चेंडू फलंदाज बाेल्‍ड पण, नो बॉल = १ धाव
19.6 – शेवटचा चेंडू, नो बॉल आणि षटकार = ७ धावा
19.6 – शेवटचा चेंडू, नो बॉल, २ धावा, एकूण २ धावा
19.6 – शेवटचा चेंडू वाईड – २ धाव
19.6 – शेवटचा चेंडू, षटकार = ६ धावा

याचा अर्थ शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अभिषेकला ५ चेंडू टाकावे लागले. त्याने या एका चेंडूसाठी एकूण १८ धावा दिल्या. अभिषेक भारताकडून एका चेंडूवर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. एका चेंडूवर सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम क्लिंट मॅकॉयच्या नावावर आहे. ज्याने २०१२-१३ च्या बिग बॅश लीग हंगामात एका सामन्यात १ चेंडूत २० धावा दिल्या होत्‍या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news