कारगिल विजय दिन : युद्ध व संरक्षणक्षमता वाढविण्याची गरज ; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रेय शेकटकर

कारगिल विजय दिन : युद्ध व संरक्षणक्षमता वाढविण्याची गरज ; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रेय शेकटकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारत कधीही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकतो आणि आपले मनसुबे धुळीस मिळू शकतात, अशी धडकी कारगिलच्या विजयानंतर आजही पाकिस्तानला बसलेली आहे. कारगिलची पुनरावृत्ती टाळायची असेल तर भारताने युद्धक्षमता व संरक्षणक्षमता कमालीची वाढविण्याची गरज आहे. पीओके ताब्यात घ्यायचा असेल, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन रणनीती आखली पाहिजे, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रेय शेकटकर यांनी व्यक्त केले.

कारगिल विजय दिनानिमित्त शेकटकर यांनी विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले की, कारगिलचा परिसर पूर्ण पर्वतीय क्षेत्र आहे. उंच डोंगरावर जो कोणी बसेल तेथून तो श्रीनगर-लेह-लडाखपर्यंत कायमचा ताबा ठेवू शकतो. कारगिलच्या पुढेच पाकव्याप्त कश्मीरचे क्षेत्र आहे. कारगिलप्रमाणेच भारत पीओकेही कधीही ताब्यात घेऊ शकतो, याची भीती पाकिस्तानला वाटते. जेव्हा युद्ध झाले तेव्हा जनरल मुशरफ यांनी त्या वेळचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दूर ठेवत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. चीन त्याच्या बॉर्डरवर लक्ष ठेवून होता.

कारगिलच्या पुढे पीओके सीमा असून, त्या क्षेत्रापासून अफगाणिस्तानची सीमा केवळ 80 किलोमीटर एवढीच आहे. पाकिस्तानलाही भीती आहे की भारताने पीओपीवर कब्जा मिळविला तर अफगाणिस्तानही त्याच्या सीमेला लागेल. म्हणून भारताला पीओकेपर्यंत येऊ देता कामा, नये यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रणनीती आखत ताबा ठेवण्यात यशस्वी झाला आहे. पाकिस्तानने हे करताना सैन्याला सिव्हिल कपड्यांवर पाठवले होते. जेव्हा चकमक सुरू झाली तेव्हा कळाले की हे सिव्हिलियन नसून पाकचे सैनिक आहेत. सीमेलगतच्या सिव्हिलियन लोकांच्या मदतीने पाकने अनधिकृत कब्जा मिळविला तसाच सहभाग भारतीय सैन्य सिव्हिल लोकांचा वाापर करून पीओकेपर्यंत कुठल्याही क्षणी येऊ शकतो, ही भीती पाकच्या उरात
भरली आहे.

क्षमता नसतानाही पीओकेवर पाकिस्तानच्या कुरापती
भारतीय संरक्षण दलाच्या सुधाराकरिता संरक्षण क्षमतावाढ समितीच्याअध्यक्षपदी राहिलो असल्याने ती कृती पुन्हा होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. कारगिलच्या युद्धाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय सैन्याने सीमेलगत एअर फोर्स संरक्षण आणि युद्धक्षमता वाढविण्यासाठी सैन्यबळ वाढविणे गरजेचे आहे. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच एका मुलाखतीत पाकला इशारा दिला आहे. तरीही क्षमता नसतानाही तो पीओकेवर कुरापती करीत आहे. संरक्षण दलानेदेखील कारगिलच्या सीमेवर सैन्यबळासह लांब पल्ल्याची
क्षेपणास्त्रे तैनात करून अप्रत्यक्षपणे पाऊल टाकण्याची कृती केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news