Shravan Special : वजन कमी करताय मग श्रावणात असा करा उपवास…

Shravan Special : वजन कमी करताय मग श्रावणात असा करा उपवास…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : वजन ही जवळपास 90 टक्के लोकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण त्यांच्या आहारतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डाएट प्लान तयार करतात. मात्र, तरी देखील वजन कमी होत नाही. कारण ब-याच वेळा हे डाएट प्रॉपर पद्धतीने पाळले जात नाही. खरे पाहता वजन कमी करण्यासाठी तसेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपवास हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, लोकांना उपवास कसा करावा हे माहित नसल्याने त्याचा काही फायदा होत नाही. त्यात काही काही जण तर अगदी 'उपवास म्हणशी अन् दुप्पट खाशी' अशा पद्धतीने उपवास करतात. मग उपवासाचा लाभ होत नाही. उपवासाला धार्मिक, अध्यात्मिक आणि शास्त्रीय असे वेगवेगळ्या प्रकारचे महत्व आहे. तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही उपवास करा मात्र उपवास करताना आधी त्याचे महत्व लक्षात घ्या.

श्रावण महिना धार्मिक, अध्यात्मिक आणि शास्त्रीय अशा तिन्ही दृष्ट्या महत्वाचा आहे. त्यामुळे धार्मिक, अध्यात्मिक आणि शास्त्रीय तिन्ही दृष्ट्या तुम्ही उपवास करू शकता. त्यात जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपवास करत असाल तर श्रावण महिन्यात केलेला उपवास हा नेहमीच लाभदायक असतो. पण उपवास करताना शरीरशास्त्रीय नियम पाळून जर तुम्ही उपवास केला तर वजन कमी करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल…

शरीरशास्त्रीय नियम…

श्रावण महिन्यात पचन शक्ती मंदावली जाते त्यामुळे पचनासाठी हलके असलेले पदार्थ खावे असा एक नियम आहे. मात्र, हलके पदार्थ कोणते आणि कोणते नाही हे ही ठरवायला हवे. तसेच हलके पदार्थ वारंवार खाऊ नये. उदाहरणार्थ चिप्स, उपवासाचा चिवडा हे वरवर दिसणारे पदार्थ आपल्याला हलके वाटतात. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वात पहिले तर बटाट्यात मुळातच मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो. स्टार्च हा घटक गॅस तयार करणारा आणि पोट फुगवणारा तसेच वाढवणारा असतो. त्यामुळे बटाट्याचे चिप्स हे हलके दिसत असतील तरीही ते पोटाला पचनासाठी हलके नसतात. तीच गोष्ट साबुदाणा खिचडी, फराळी चिवडा, इत्यादी पदार्थांची आहे. त्यामुळे हलके पदार्थ घ्यावेत पण जे पचनासाठी हलके असतात ते खावेत. साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा त्याची गंजी करून खाल्ली तर ती पचनासाठी हलकी असते तसेच पौष्टिक असून वजन कमी करण्यासाठी देखील याची मदत होते.

वेळेच्या नियम पाळा 

तस तरं उपवासाचा आणि वेळेच्या नियमांचा काय संबंध असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही 'कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खा' असे डॉ. दीक्षित यांचे मोठे संशोधन आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळा जेवायला हवे आणि दोन जेवणाच्यामध्ये आठ तासांचे अंतर ठेवायला हवे. असा नियम पाळून केलेल्या उपवासाने हमखास वजन कमी होते.

24 तासापैकी किमान 16 तास उपवास करावा

दिवसाचे 24 तास असतात. त्यापैकी साधारण आठ तास झोपणे आणि स्नानादि कार्यात जातात. उरलेल्या 16 तासात उपवास करायचा असतो. याचा अर्थ असा सकाळी उठण्याची वेळी आणि रात्री झोपण्याची वेळ या दोन्ही वेळा तुमच्या निश्चित असायला हव्या. या दोन्ही वेळा निश्चित करून घेऊन या दोन्ही वेळेच्या मध्यल्या वेळेत तुम्हाला जेवण करायचे आहे. म्हणजे जर सकाळी 6 वाजता उठला तर दुपारी दोन वाजता जेवण करायला हवे. उपवास असेल तर पोटाला पचेल असा हलका पदार्थ खायचा आहे. त्यानंतर रात्री नऊला जेवण करायचे आहे. तुम्ही एकवेळ उपवास करणार असाल तर शक्यतो रात्रीचे हलके जेवण जेवून दुपारी काहीही खाऊ नये. दोन वेळ जेवण करून उपवास करणार असाल तर दोन्ही वेळा ठरवून बरोबर त्याच वेळेला पचायला हलके पदार्थ खाऊन उपवास करा. मधल्या वेळेत काहीही खाऊ नये. अगदीच भूक लागली असेल तर फळांचा ताजा रस करून साखर न टाकता प्यावा. ज्यामुळे दिवसातून 16 तास तुमचा उपवास होईल. जो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news