EMI Benefits : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी वेळ वाढवून हवा आहे? जाणून घ्या बँकेची प्रक्रिया…

EMI Benefits : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी वेळ वाढवून हवा आहे? जाणून घ्या बँकेची प्रक्रिया…
Published on
Updated on

EMI Benefits : ग्राहकांची गरज ओळखून बँकांनी वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज यासारख्या कर्जांची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण नियमितपणे कर्ज फेडत असाल आणि आतापर्यंत एकही हप्ता चुकलेला नसेल, तर पुढेदेखील कोणतीही समस्या राहणार नाही.

आर्थिक अडचणीच्या वेळी बँकेडून काही महिन्यांसाठी हप्ता स्थगितीची सुविधा दिली जाते. कोरोना काळात या सुविधेचा हजारो ग्राहकांनी लाभ घेतला. कारण, या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते आणि खासगी कंपनीत वेतनात कपातही झाली होती.

ग्राहकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी बँकेडून कर्ज घेणे ही सामान्य बाब ठरली आहे. जनतेच्या गरजा भागविण्यासाठी बँकेकडून विविध प्रकारचे कर्ज दिले जाते आणि ते नियमित फेडणे ग्राहकांचे कर्तव्य असते; मात्र एखादेवेळी हप्ता भरण्यास विलंब झाला, तर दंड आकारणीपासून मालमत्ता जप्तीसारखी कारवाई बँकेकडून केली जाते. अशावेळी बँकेच्या गृहकर्जाचा हप्ता भरला नाही, तर यासाठी अधिक वेळ कसा मिळू शकतो, हे जाणून घेऊ.

EMI Benefits : बँक काय करते?

आपण बँकेचा हप्ता नियमित भरत असाल, तर कोणतीही अडचण येणार नाही; मात्र सलग तीन महिने हप्ता भरू शकला नाही, तर बँकेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर गृह कर्जाला एनपीएमध्ये परावर्तीत केले जाऊ शकते.

सिबील ब्यूरोला बँकेकडून अहवाल जाईल. त्याला कर्जदात्याचा अहवाल असेही म्हणतात. हप्ता थकीत राहिल्यास सिबील स्कोर कमी होईल. परिणामी, ग्राहकाला अन्य बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता कमीच राहते. ग्राहकाला डअठऋअएडख कायद्यानुसार नोटीस पाठविली जाईल.

ग्राहकाला नोटीस मिळताच दोन महिन्यांच्या आत थकीत रक्कम भरणे अपेक्षित आहे. अशी कृती न केल्यास बँकेकडून कर्जदाराची मालमत्ता जप्त केली जाते आणि त्याला पूर्वसूचना न देताच लिलावात त्या मालमत्तेची विक्री होईल. या कार्यवाहीतून बँक रक्कम वसूल करते.

EMI Benefits : हप्ता भरण्यासाठी वेळ कशी वाढवून मिळेल?

संभाव्य दंडात्मक कारवाई किंवा जप्तीची कारवाई टाळण्यासाठी बँकांकडून ग्राहकांना काही पर्याय दिले जातात. कर्जदारांना हप्ता भरण्यासाठी काही कालावधीपुरती सवलत मिळू शकते. यासाठी कशी प्रक्रिया होते, ते पाहू.

या माध्यमातून ग्राहकांना एका ठरावीक काळासाठी बँकेकडून हप्ता स्थगित करता येतो. त्यानंतर कर्जाचा हप्ता नव्याने सुरू केला जाऊ शकतो. यानुसार बँकेने दंडमाफीची योजना आणली असेल, तर त्याचा ग्राहक लाभ घेऊ शकतो. यानुसार पैशाची बचत होते आणि सिबील स्कोअरवर फारसा परिणाम होत नाही. कर्जदाराने बँकेशी संपर्क करत आर्थिक स्थितीची माहिती देणे गरजेचे आहे. यानुसार तो काही दिवसांसाठी सवलत देण्याची मागणी करू शकतो. बँकेने ग्राहकाची विनंती मान्य केली, तर काही महिन्यांसाठी हप्ता स्थगित होऊ शकतो.

जेव्हा आपण कर्ज फेडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू कराल तेव्हा कर्ज फेडर्‍याचा कालावधी आपोआप वाढेल. याशिवाय ग्राहक बँकेशी संपर्क करू शकतो आणि हप्ता अधिक असल्याचेही सांगू शकतो. बँकेच्या व्यवस्थापनाकडून ग्राहकाची विनंती मान्य केली जाईल आणि हप्त्याची रक्कम कमी करत कर्जफेडीचा कालावधी मात्र वाढविण्यात येईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news