वेध शेअर बाजाराचा : तेजीचा सप्ताह… बाजारात उत्साह! | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : तेजीचा सप्ताह... बाजारात उत्साह!

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

मागील शुक्रवारी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला बाजाराने तेजीची सलामी दिल्यामुळे आशेची लहर निर्माण झाल्याचे म्हटले होते. गेल्या आठवड्यातही आशेची लहर अधिक पल्लवीत झाली. कारण, पाचही दिवस बाजाराने तेजीची दिशा पकडली. निफ्टी दीड टक्क्याहून अधिक वाढून 45156.40 वर बंद झाला. निफ्टीचे 19800 च्या वर आणि निफ्टी बँकेचे 45000 च्यावर साप्ताहिक पातळीवर बंद होणे ही सुखावह बाब आहे. सेन्सेक्सही जवळपास पावणे दोन टक्क्यांनी वाढून 66598.91 वर बंद झाला. निफ्टी मिड कॅप निर्देशांक त्यांच्या उच्चतम पातळीवर ट्रेड करीत आहेत.

MMTC, IRFC, BBTC, BSE, RVNL आणि Coal India हे शेअर्स आठवड्यात 20 टक्क्यांहून अधिक वाढले. यापैकी MMTC आणि IRFC हे दोन शेअर्स, तर 50 टक्क्यांहून अधिक वाढले. या दोन्हीही सरकारी कंपन्या एक खनिज क्षेत्रात ट्रेडिंग करणारी, तर दुसरी रेल्वे क्षेत्रातील MMTC चा शेअर केवळ तीन महिन्यांत दुप्पट झाला आहे. भारताच्या Mineral Exploration and Trading Sector मध्ये MMTC चे स्थान अनन्यसाधारण आहे. Clean Energy च्या दिशेने भारताचे आणि एकूणच जगाचे वळलेले लक्ष आणि त्या अनुषंगाने लिथियम, कोबाल्ट, सिलीकॉन वगैरे दुर्मीळ धातूंच्या उत्खननामध्ये भारताने वाढवलेले लक्ष ही बाब MMTC च्या तेजीला कारणीभूत आहे. 65.40 रुपयांना मिळणारा हा शेअर तीन अंकी किंमत कधी दाखवेल ते कळणारही नाही. कारण, जम्मू आणि काश्मीरमधील खाणींसाठी शासन लिलाव जाहीर करेल तेव्हा MMTC ला ऑर्डर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

BSE च्या शेअरनेही गेल्या तीन महिन्यांत असाच 135 टक्के परतावा दिला आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीतील कंपनीचे समाधारकारक निकाल आणि कंपनीच्या बाय-बॅक धोरणामुळे हा शेअर तेजीत आहे.

IRFC, RVNL या शेअर्सची चर्चा आपण मागील लेखात केली होती. याच्याच जोडीने खालील शेअर्सही गेल्या एका वर्षात दोनशे टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

1) Jindal Stainless
2) JBM Auto
3) Apar Industries
4) The Fertilizers and chemicals, Travancore

शासनाचे GST Collection ऑगस्ट महिन्यात 1.59 लाख कोटी रुपये झाले. दीड लाख कोटींच्यावर GST Collection होण्याचा हा सलग सहावा महिना. भारताचे विदेशी कर्ज मार्च 2022 मध्ये जीडीपीच्या 20 टक्के होते. ते मार्च 2023 मध्ये 18.9 टक्यांपर्यंत खाली आले.

कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO उदय कोटक यांची आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. त्यांचा वारसदार येईपर्यंत दोन महिने बँकेचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर दीपक गुप्ता हे काम पाहतील.

9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 राष्ट्रांची 18 वी परीषद नवी दिल्ली येथे झाली. भारताने प्रथमच या परिषदेचे यजमानपद भूषवले आहे.

गेल्या काही दिवसांत मार्केटने Reversal दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकादा निफ्टीने 20000 चा आकडा पार करण्याची उत्कंठा वाढत आहे. येत्या आठवड्यात तो पार झाला, तर दिवाळीपर्यंत मार्केट New high दाखवेल, यात शंका नाही. थोड्याच काळावर येऊन ठेपलेल्या निवडणुका पाहता त्या पार पडण्यापूर्वी बाजारावर मोठ्या तेजीची मोहर उमटणे आवश्यक आहे.

UBL, Ambyja cements, KNR Contruction Indiabulls Resl Estare त्या शेअर्रमध्ये गोल्डन क्रॉसओव्हर झालेला आहे. येणार्‍या आठवड्यात या शेअर्सकडे लक्ष द्यावे.

EKL, Energy Services Ltd हा एक ‘बेहतरीन’ शेअर आहे. जागेअभावी पुढील लेखात आपण त्याची सविस्तर चर्चा करू. तूर्त शुक्रवारचा त्याचा बंद भाव आहे 444.95 रुपये. या शेअर्सचा उच्चांकी भाव 3150 होता. जून 2023 मध्ये 345 चा नीचांक दाखवून या शेअरने Reversal चे संकेत दिले आहेत. आवश्यक गुंतवणूक करावी, असे उज्ज्वल भवितव्य या कंपनीचे आहे.

Back to top button