पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी चित्रपट 'द वॅक्सीन वॉर' मुळे विवेक अग्निहोत्री चर्चेत आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी रिलीज केला जाईल. विवेक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, ते महाभारतवर चित्रपट आणण्याचा विचार करत आहेत. (Vivek Agnihotri) ते म्हणाले की, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाचन, रिसर्च करणे, ॲनालाईज करणे आणि आपले आयुष्य भाषणांमध्ये समाविष्ट केले आहे. पौराणिक कथांवर जर चित्रपट आणायचा असेल तर ते त्यास इतिहासाप्रमाणे आणले जाईल. (Vivek Agnihotri)
ते पुढे म्हणाले, 'दुसरे लोक बॉक्स ऑफिससाशठी काहीही बनवत आहेत. पण मी लोकांसाठी बनवेन. दुसऱ्या लोकांनी अर्जुन, भीम आणि अन्य सर्वांना केवळ प्रदर्शन म्हणून दाखवलं आहे. माझ्यासाठी महाभारत धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे.'
यादिवशी रिलीज होणार वॅक्सीन वॉर
'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' ओटीटी प्लॅटफॉर्म जी5 वर रिलीज झाला. आता पुढील चित्रपट 'द वॅक्सीन वॉर: ए ट्रू स्टोरी' २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाची झलक पोस्ट केली होती. सोबतच त्यांनी लिहिले होतं – 'डेट अनाउंसमेंट: डियर फ्रेंड्स, तुमचा चित्रपट फिल्म द वॅक्सीन वॉर: ए ट्रू स्टोरी २८ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात रिलीज होईल. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या.'