Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्यांदा मराठी बातम्या वाचणारे निवेदक, ज्येष्ठ  माध्यमकर्मी विश्वास मेहंदळे यांच आज वृद्धापकाळाने निधन झाल. ते ८४ वर्षांचे होते. 10 जुलै 1939 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे. १८ हून अधिक पुस्तकांचं लेखन केल आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मुलुंड पूर्व इथे ठेवण्यात आलं आहे. (Vishwas Mehendale )

माहितीनूसार, दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे ते पहिले निवेदक ठरले होते. त्याचबरोबर ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही ठरले आहेत. तेथेच ते संचालक म्हणूनही काम कार्यरत राहीले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचा पदभारही त्यांनी सांभाळला आहे.

Vishwas Mehendale : डॉ. विश्वास मेहेंदळे यांची ग्रंथसंपदा

आपले पंतप्रधान, आपले वैज्ञानिक, ओली-सुकी, पंडितजी ते अटलजी, इंदिरा गांधी व लीला गांधी, मला भेटलेली माणसं, केसरीकारांच्या पाच पिढ्या, गांधी ते पटेल, तुझी माझी जोडी, यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव ते अशोकराव, यशवंतराव ते विलासराव, राष्ट्रपती, सरसंघचालक, नाट्यद्वयी, भटाचा पोर (वैचारिक), मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ), मीडिया, नरम-गरम (कथासंग्रह), आदी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. 'मला भेटलेली माणसे'  हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला.

बहुआयामी व्यक्तीमत्व 

विश्वास मेहंदळे यांनी काही नाटकांमध्येही भूमिका केल्या आहेत. पुढील नाटकात त्यांनी भूमिका केल्या आहेत. (कंसात त्यांच्या भूमिकेचं नाव दिलं आहे.) अग्निदिव्य (अप्पा), एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा (प्रधान), खून पहावा करून, जर असं घडलं तर (इन्स्पेक्टर), नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा (पंडित), प्रेमा तुझा रंग कसा (प्रो. बल्लाळ), भावबंधन, मगरूर (अण्णा), मृत्युंजय (शकुनी), लग्न ( भाई), शारदा, सासूबाईंचं असंच असतं (सहस्रबुद्धे), स्पर्श (अप्पा), स्वरसम्राज्ञी (भैय्यासाब) आदी नाटकांत भूमिका केल्या आहेत.

बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या विश्वास मेहेंदळे यांनी 'लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखांवर' त्यांनी पीएचडी केली आहे. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत डॉ.विश्वास मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहीली, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,"दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news